IPL 2023 : जोस बटलरच्या नावावर नवा विक्रम; कोहली, रोहित, धोनीलाही टाकले मागे | पुढारी

IPL 2023 : जोस बटलरच्या नावावर नवा विक्रम; कोहली, रोहित, धोनीलाही टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२३ च्या १७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरच्या नावावर नवा विक्रम नोंदवला गेला आहे. जोस बटलर आयपीएलमध्ये सर्वात जलद ३ हजार धावा पूर्ण करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. बुधवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात जोस बटलरने हा पराक्रम केला.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध जोस बटलर ३ हजार धावा पूर्ण करणारा २१ वा खेळाडू बनला आहे. बटलरने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात १७ धावा करताच आयपीएलमधील आपल्या तीन हजार धावा पूर्ण केल्या. डावांच्या बाबतीत सर्वात जलद ३ हजार धावा करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. सर्वात वेगवान ३ हजार धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात बटलरने ३६ चेंडूत ५२ धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने एक चौकार आणि तीन षटकार मारले.

IPL मध्ये सर्वात जलद ३ हजार धावा करणारे खेळाडू :

७५ डाव – ख्रिस गेल

८० डाव – केएल राहुल

८५ डाव – जोस बटलर

९४ डाव – डेव्हिड वॉर्नर

९४ डाव – फाफ डू प्लेसिस

हेही वाचा : 

Back to top button