Mohammed Siraj Bowling : सिराजने फेकले IPL इतिहासातले सर्वात लांबलचक षटक! | पुढारी

Mohammed Siraj Bowling : सिराजने फेकले IPL इतिहासातले सर्वात लांबलचक षटक!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mohammed Siraj Bowling : आरसीबीने आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 8 गडी राखून पराभव केला. मुंबईने आरसीबीला विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य दिले, ते विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसच्या खेळीच्या जोरावर आरसीबीने सहज गाठले. आरसीबीचा गोलंदाज मोहम्मद सिराजने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली, पण त्याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला.

एका षटकात फेकले 11 चेंडू

सिराजने मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याच्या चार षटकांत 21 धावांच्या मोबदल्यात 1 बळी मिळवला. त्याने पहिल्या षटकात फक्त 2 धावा दिल्या. तर दुसऱ्या षटकात 1 धाव दिली. तिसऱ्या षटकातही त्याने टीच्चून मारा केला. पण 19 वे षटक पूर्ण करताना सिराजने चक्क 11 चेंडूत फेकले.

अन् लय बिघडली

सिराजने 19 व्या षटकाचा पहिला चेंडू डॉट टाकला. यानंतर त्याच्या दुसऱ्या चेंडूवर धाव घेण्यात फलंदाज यशस्वी झाला. त्यानंतर त्याने सलग चार चेंडू वाईड टाकले आणि त्याने आपली लय गमावली. अखेर तिसऱ्या चेंडू पूर्ण झाला, पोअण त्यावर प्रतिस्पर्धी संघाला धाव मिळाली. पुढच्या दोन म्हणजे चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर चौकार मरण्यात आले. त्यानंतर सिराजने पुन्हा वाईड टाकला. अखेर सहावा चेंडू डॉट टाकण्यात तो यशस्वी झाला. याबरोबरच हे षटक पूओर्ण झाले. या षटकात सिराजने एकूण 11 चेंडू टाकले. हे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठे षटक ठरले. सिराजने या षटकात एकूण 16 धावा दिल्या. याआधी आयपीएलमध्ये सर्वात मोठे षटक टाकण्याचा विक्रम मुनाफ पटेलच्या नावावर होता. त्याने 2012 मध्ये 10 चेंडूत एक षटक पूर्ण केले होते.

हेही वाचा :

Back to top button