IPL 2023 : न्यूझीलंडचा ‘हा’ स्टार खेळाडू खेळणार ‘आरसीबी’कडून | पुढारी

IPL 2023 : न्यूझीलंडचा 'हा' स्टार खेळाडू खेळणार 'आरसीबी'कडून

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा फलंदाज विल जॅक्स दुखापतीमुळे इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल ) आगामी मोसमातून बाहेर पडला आहे. त्याला यंदाच्या मिनी लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 3.2 कोटी रुपयांना विकत घेतले होते. विल जॅक्स आयपीएलमधून बाहेर पडल्यामुळे आरसीबी व्यवस्थापनाने त्याच्या जागी न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेलचा संघात समावेश केला आहे. (RCB)

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या वन-डे सामन्यात विल जॅकला दुखापत झाली होती. जॅकला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३.२ कोटी रुपयांना खरेदी केले होते. डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर त्याने आयपीएलच्या आगामी हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. जॅकने या वर्षी इंग्लंडकडून क्रिकेटच्‍या तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे. दुखापतीमुळे वन-डे विश्वचषक संघातील त्याचे स्थानही धोक्यात येऊ शकते. (RCB)

ब्रेसवेलने भारताविरुद्धच्या वनडेत झंझावाती शतक झळकावले आहे. यावर्षी न्यूझीलंड आणि भारत यांच्यात झालेल्या पहिल्या वन-डे सामन्यात त्याने ७८ चेंडूत १४० धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने १२ चौकार आणि १० षटकार मारले होते.
ब्रेसवेलने १६ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ११३ धावा केल्या असून २१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याला १ कोटी रुपयांच्या मूळ किमतीवर आरसीबीमध्ये सामील करण्यात आले आहे. आयपीएल लिलावात ब्रेसवेलला कोणीही आपल्या संघात घेतले नव्हते. प्रथमच तो आयपीएल हंगामात पदार्पण करणार आहे. आरसीबीचा पहिला सामना २ एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळवण्यात येणार आहे.

आयपीएल 2023 साठी आरसीबीचा संघ

फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन ऍलन, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मोहम्मद सिराज, जोश वुडल , सिद्धार्थ कौल, आकाश दीप, सोनू यादव, अविनाश सिंग, राजन कुमार, मनोज भंडागे, हिमांशू शर्मा, रीस टोपले, मायकल ब्रेसवेल.

हेही वाचा;

Back to top button