पिंपरी : महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण | पुढारी

पिंपरी : महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : महात्मा बसवेश्वर पुतळा समिती आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती उद्यानाजवळील मोकळ्या जागेत उभारलेल्या महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे लवकर अनावरण करावे, अशी आग्रही मागणी पुतळा समितीने महापालिका प्रशासनाकडे केली.

याबाबत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना लेखीपत्र दिले आहे. याप्रसंगी कार्याध्यक्ष शिवाजी साखरे, अण्णाराय बिरादार, गुरुराज चरंतीमठ आदी उपस्थित होते. नारायण बहिरवाडे म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचे अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. अशा महामानवाचा पुतळा पिंपरी-चिंचवड शहरात असावा, अशी मागणी शहरातील विरशैव लिंगायत समाजातील बांधवांनी केली होती.

लोकवर्गणीतून बनविला पुतळा
त्यासाठी पुतळा समितीची स्थापना केली. लिंगायत समाजातील सर्व घटकांकडून लोकवर्गणीतून महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बनवून घेतला. शिल्पकार पंकज तांबे यांनी हा पुतळा बनविला आहे. यासाठी 27 लाख रुपये खर्च आला. लोकवर्गणीतून पुतळा बनविण्यात आला. पुतळा बसविण्यासाठी समितीने महापालिकेकडे जागा मागितली. त्यानुसार निगडीतील भक्ती-शक्ती उद्यानाजवळील 45 मीटर स्पाईन आणि बीआरटी रस्त्याच्या जंक्शनजवळ असलेली मोकळी जागा महापालिकेने उपलब्ध करुन दिली. शिल्पकार पंकज तांबे यांनी साडेचार वर्षात ब—ाँझच्या धातुचा 12 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा बनविला आहे. महात्मा बसवेश्वर महाराज यांनी केलेल्या कार्याचे म्युअरल्सदेखील बसविण्यात आले आहेत.

विद्युत रोषणाई
पुतळा परिसराचे सुशोभीकरण, बागेची निर्मिती, वृक्षारोपण करण्यात आले आहे. विद्युत रोषणाई देखील केली आहे. सीमाभिंत उभारली आहे. या पुतळ्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्या हस्ते लवकर अनावरण करावे, अशी मागणी समितीने महापालिकेकडे केली.

Back to top button