MS Dhoni Muscular Body : धोनीचा ‘बाहुबली’ अवतार! ‘मस्क्युलर बॉडी’ पाहून चाहते थक्क

पुढारी ऑनलाईन डेस्क : MS Dhoni Muscular Body : इंडियन प्रीमियर लीग (IPL)ची तयारी करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये धोनीची मस्क्युलर बॉडी पाहून चाहते त्याच्या फिटनेसचे कौतुक करत आहेत.
2020 मध्ये धोनीला त्याच्या फिटनेसमुळे ट्रोल करण्यात आले. आयपीएलच्या हंगामात धोनी पांढर्या दाढीसह जाडजुड शरीरयष्टीमध्ये दिसला होता. त्यामुळे लोकांनी त्याची खिल्ली उडवली होती.
2020 हंगामातील सामन्यांत धोनी मैदानावर धावताना अनेकदा थकलेला दिसला. त्या हंगामात त्याने 14 सामन्यांमध्ये केवळ 200 धावा केल्या होत्या. पुढच्या म्हणजे 2021 च्या आयपीएलमध्ये तर त्याची कामगिरी आणखी खराब झाली होती. त्या हंगामात त्याने 16 सामन्यांत फक्त 114 धावा केल्या. (MS Dhoni Muscular Body)
यावेळी मात्र धोनीने आपल्या फिटनेसवर जबरदस्त काम केले आहे. त्याची मस्क्युलर बॉडी आणि धडाकेबाज सराव पाहता त्याने यंदाची आयपीएल स्पर्धा जिंकायचीच असा इरादा पक्का केला आहे. त्याच्या मस्क्युलर बॉडीचा फोटो पाहून चाहत्यांना धोनीकडून खूप मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्जच्या सराव सत्रात माही चांगलाच घाम गाळत आहे. अशा परिस्थितीत तो पुन्हा एकदा आपल्या फटकेबाजीने चाहत्यांचे मनोरंजन करेल यात शंका नाही. सराव सत्रात धोनी चांगलाच फॉर्ममध्ये दिसला. त्याने आपल्या ताकदवान हातांनी अनेक दमदार शॉट्स मारले. (MS Dhoni Muscular Body)
The biceps of MS Dhoni. pic.twitter.com/is7ltAfUi2
— Johns. (@CricCrazyJohns) March 15, 2023
2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली
महेंद्रसिंग धोनीने 2019 च्या विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत राहिला आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार असण्यासोबतच धोनी एक उत्कृष्ट फलंदाजही आहे. त्याने या लीगमध्ये आतापर्यंत एकूण 234 सामने खेळले असून 135.2 च्या स्ट्राइक रेटने 4978 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या नावावर 24 अर्धशतके आहेत.
याशिवाय त्याने टीम इंडियासाठी 90 कसोटी, 350 वनडे आणि 98 टी-20 सामनेही खेळले आहेत. धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये 4876 धावा केल्या आहेत तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10773 धावा केल्या आहेत. आणि टी-20 मध्ये त्याने 1617 धावा केल्या. याशिवाय धोनी हा भारताचा एकमेव कर्णधार आहे ज्याने आयसीसी टी-20 विश्वचषक, वनडे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.
हेही वाचा :
- IND vs AUS ODI : ‘वनडे’त ऑस्ट्रेलियाचे पारडे जड, वर्चस्व राखण्याचे टीम इंडियापुढे आव्हान
- David Warner DC Captain : डेव्हीड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार, अक्षर पटेल उपकर्णधार
- Virat Kohli Dance: बॅटींग स्टाईलमध्ये विराटचा डान्स व्हायरल! नॉर्वेच्या ग्रुपनेही धरला ठेका(Video)
- Virat Kohli : विराट कोहलीच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम!