Virat Kohli Dance: बॅटींग स्टाईलमध्ये विराटचा डान्स व्हायरल! नॉर्वेच्या ग्रुपनेही धरला ठेका(Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Dance : विराट कोहलीने फॉर्ममध्ये परतल्यानंतर वर्चस्व राखले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना संपल्यानतर त्याने लगेचच आयपीएलचा प्रोमो शूट केला. तसेच विराटचा नॉर्वेच्या एका प्रसिद्ध ग्रुपसोबतचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोहलीने स्वतः हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
विराटने बनवली रील (Virat Kohli Dance)
विराट कोहलीने मंगळवारी मुंबईत नॉर्वेजियन डान्स ग्रुप क्विक स्टाइलच्या सदस्यांची भेट घेतली. यावेळी विराटने या ग्रुपसोबत एक डान्स रील बनवले. स्टार क्रिकेटर ‘स्टिरीओ नेशन’च्या ‘इश्क’ गाण्यावर थिरकला. त्यात क्विक स्टाईलचा एक सदस्य क्रिकेटची बॅट उचलतो. या बॅटचे काय करावे हे त्याला कळत नाही. त्यानंतर पांढरा टी-शर्ट आणि काळी जीन्स परिधान केलेला विराट कोहलीची सीनमध्ये एन्ट्री होते. क्विक स्टाईलच्या सदस्याकडून विराट बॅट आपल्या हातात घेतो आणि डान्स स्टेप्स करू लागतो. त्याचे नृत्य पाहुन क्विक स्टाईलचे इतर सदस्यही कोहलीची स्टेप कॉपी करून नाचायला लागतात.
या व्हिडिओमध्ये भारताच्या स्टार फलंदाजाची वेगळी स्टाइल चाहत्यांना पाहायला मिळत आहे. हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटक-यांच्या पसंतीस पडला आहे. डान्सचा व्हिडिओ विराटने (Virat Kohli Dance) आपल्या इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तो म्हणतो की, ‘मुंबईत मी कुणाला भेटलो याचा अंदाज लावा.’
‘क्विक स्टाइल’ ग्रुप (quick style group) बॉलिवूड गाण्यांवर डान्स करण्यासाठी प्रसिद्ध
नॉर्वेचा डान्स क्रू क्विक स्टाइल बॉलिवूड गाण्यांवर डान्स करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. याशिवाय या ग्रुपने अनेक गाण्यांवर आकर्षक नृत्याचे सादरीकरण केले आहे. क्विक स्टाईलने काही महिन्यांपूर्वी त्याच्याच सदस्याच्या लग्नात गुरू रंधवाच्या ‘काला चष्मा’ आणि लैहंबर हुसेनपुरीच्या ‘सदी गल्ली’ या गाण्यांवर डान्स केला होता. हे व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले होते. त्यानंतर या डान्स ग्रुपची भारतातील लोकप्रियता वाढली.
View this post on Instagram
Guess who I met in mumbai 🔥👀 @TheQuickstyle pic.twitter.com/wbHcM6JRo9
— Virat Kohli (@imVkohli) March 14, 2023