Bismah Maroof : महिला टी-20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानच्या कर्णधारचा राजीनामा | पुढारी

Bismah Maroof : महिला टी-20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानच्या कर्णधारचा राजीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानची अनुभवी खेळाडू बिस्माह मारूफने महिला संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेत महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाने केवळ एकच सामना जिंकला. या निराशाजनक कामगिरीनंतर तिने हा निर्णय घेतला आहे. ब गटात पाकिस्तानी संघ भारताविरुद्ध पराभूत झाला होता. तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजनेही त्यांच्यावर मात केली. पाकिस्तानला केवळ आयर्लंडविरुद्ध विजय मिळवता आला. पाकिस्तान गटात चौथ्या स्थानावर राहिला. (Bismah Maroof)

बिस्माह मारूफने मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी) उशिरा ट्विटरवर कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. तिने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष नजम सेठी यांना सांगितले की, एक खेळाडू म्हणून संघासाठी उपलब्ध असेन. माझ्या देशाच्या संघाचे कर्णधारपद मिळणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मेहनती क्रिकेटपटूंचे नेतृत्व करण्यासाठी मी स्वताला भाग्यवान समजते. (Bismah Maroof)

मारूफचा कर्णधार म्हणून विक्रम

मारूफने 64 टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानी संघाचे नेतृत्व केले. यादरम्यान पाकिस्तानने 27 सामन्यात विजय मिळवले. त्याचबरोबर तिने 34 एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. यापैकी 16 विजय सामन्यात यश मिळवले. मारूफच्या नेतृत्वाखाली गेल्या महिला टी-२० विश्वचषकातही (२०२०) संघाला केवळ एकच विजय मिळाला होता.

हेही वाचा;

Back to top button