पुढारी ऑनलाईन डेस्क : घानाचा फुटबॉलपटू आणि न्यूकॅसलचा माजी मीडफिल्डर ख्रिस्टिन अत्सू याचा तुर्कीच्या भूकंपात मृत्यू झाला. याबद्दल त्याचे व्यवस्थापक मुरत उझुनमेहमेट यांनी मृत्यूची माहिती अधिकृतपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. (Turkey Earthquake)
ख्रिस्टिन अत्सूचे व्यवस्थापक मुरत उझुनमेहमेट यांनी शनिवारी (दि. १८) डी.एच.ए. वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत सांगितले की, तुर्कीच्या दक्षिणेकडील हाते प्रांतात ढिगाऱ्याखाली त्याचा मृतदेह सापडला आहे. पुढे उझुनमेहमेट यांनी पत्रकारांना सांगितले की, "अत्सूचा मृतदेह त्याच्या निवासस्थानाच्या ढिगाऱ्याखाली सापडला आहे. यामध्ये त्याचा फोनही सापडला आहे." (Turkey Earthquake)
ख्रिस्टिन अत्सूचे एजंट नाना सेचेरे यांनी ट्विट केले की, आज सकाळी अत्सूचा मृतदेह सापडल्याचे मला सर्व हितचिंतकांना सांगावे लागत आहे. यापूर्वी १४ फेब्रुवारी रोजी नाना सेचेरे यांनी ट्विट करून सांगतिले होते की, भूकंप होऊन ९ दिवस झाले असून अत्सूबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.
हेही वाचा;