IND vs AUS : के.एल.राहुलचा 'फ्लॉप शो' सुरूच, जाणून घ्या मागील १० डावांतील कामगिरी | पुढारी

IND vs AUS : के.एल.राहुलचा 'फ्लॉप शो' सुरूच, जाणून घ्या मागील १० डावांतील कामगिरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय कसोटी संघाचा हंगामी उपकर्णधार के.एल.राहुल याचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनला आहे. उपकर्णधार असल्याने संघ व्यवस्थापन संघातून बाहेर रस्ता दाखवत नसल्याचे बोलले जात आहे. शिवाय शुभमन गिलने एकदिवसीय सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करुनही त्याला संधी दिली जात नसल्याने माजी क्रिकेटपटूंनीही नाराजी व्यक्त केली होती. राहुलच्या खराब कामगिरीमुळे पुन्हा एकदा भारताच्या सलामीवीरांना मोठी भागीदारी करता आलेली नाही. (IND vs AUS)

के.एल.राहुलपेक्षा अक्षर पटेल ठरतोय सरस (IND vs AUS)

मागील काही मालिकांमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने दमदार कामगिरी केली. मात्र, के.एल.राहुल अजूनही आपल्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल यानेही राहुलपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. त्याने सलग दोन अर्धशतक झळकावले आहेत. (IND vs AUS) अक्षरने नागपूर कसोटीमध्ये ८४ धावा केल्या तर दिल्लीच्या कसोटीमध्येही त्याने ७४ धावांची खेळी केली.

के.एल.राहुलची मागील १० डावांतील कामगिरी (IND vs AUS)

के.एल. राहुल मागील १० डावांमध्ये केवळ एक अर्धशतकीय खेळी करु शकला आहे. कसोटी मालिकेतील  एका सामन्यात त्याला २५ धावांचा आकडा पार करता आला होता. मागील दहा सामन्‍यांमध्‍ये के.एल. राहुलची कामगिरी अत्‍यंत निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही चाहत्यांकडून के.एल.राहुल याच्‍या ऐवजी शुभमन गिलला संधी देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button