Women’s T20 World Cup : टीम इंडियाचा पाकिस्तानवर शानदार विजय | पुढारी

Women's T20 World Cup : टीम इंडियाचा पाकिस्तानवर शानदार विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानने भारतासमोर 150 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात दीप्ती शर्माने जावेरिया खानला हरमनप्रीत कौरवी झेलबाद केले. जवेरियाला सहा चेंडूंत आठ धावा करता आल्या. यानंतर मुनीबा अली आणि कर्णधार बिस्माह मारूफ यांनी दुसऱ्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी केली. राधा यादवने ही भागीदारी तोडली. त्याने मुनिबाला यष्टिरक्षक रिचा घोषच्या हातून स्टंप आऊट केले. पूजा वस्त्राकरने निदा दारला खातेही उघडू दिले नाही आणि रिचाकडे झेलबाद झाली. सिद्रा अमीन 11 धावा करू शकली आणि राधाकरवी झेलबाद झाली.

यानंतर बिस्माहने आयशासोबत पाचव्या विकेटसाठी 47 चेंडूत 81 धावांची नाबाद भागीदारी केली. बिस्माहने 55 चेंडूत 68 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत सात चौकार मारले. त्याचवेळी आयशाने 25 चेंडूत 43 धावांची तुफानी खेळी केली. आपल्या खेळीत त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. शेवटच्या पाच षटकात पाकिस्तानने 58 धावा केल्या आणि एकही विकेट गमावली नाही. अशा प्रकारे 20 षटकांनंतर पाकिस्तानने 4 गडी गमावून 149 धावा केल्या. भारताकडून राधा यादवने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. त्याचवेळी पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली

भारतीय महिला संघ : शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग

पाकिस्तान महिला संघ : जावेरिया खान, मुनीबा अली, बिस्मा मारूफ (कर्णधार), निदा दार, सिद्रा अमीन, आलिया रियाझ, आयेशा नसीम, फातिमा सना, आयमान अन्वर, नशरा संधू, सादिया इक्बाल

हेही वाचा;

Back to top button