

पुढारी ऑनलाईन डेस्क : कथित फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांना बढती मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. शुक्ला यांच्यासह अतुलचंद्र कुलकर्णी, सदानंद दाते यांच्यासह २० आयपीएस अधिकाऱ्यांना बढती मिळणार आहे. शनिवारी दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
रश्मी शुक्ला या १९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. महाविकास आघाडीच्या काळात नेत्यांच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी फोन टॅपिंग केले होते, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. गुप्तवार्ता विभागाने रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून फोन टॅपिंग सुरु केले होते. ज्या नेत्यांचे फोन टॅप करायचे आहेत, त्यांची बनावट नावे सांगून हे फोन टॅपिंग सत्र सुरु केले होते. २०१९ नंतरच्या विधानसभा निवडणुकीनंतर हे प्रकरण सुरु झाले होते. दरम्यान हे फोन टॅपिंग प्रकरण बेकायदेशीर असल्याचा त्यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासााठी विशेष चौकशी पथक तयार करण्यात आली होती.
हेही वाचा