Virat Kohli’s Desire : कोणती इच्छा राहिली अपूर्ण? विराटने दिले उत्तर… | पुढारी

Virat Kohli's Desire : कोणती इच्छा राहिली अपूर्ण? विराटने दिले उत्तर...

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने जगभरातील चाहत्यांची मने जिंकणाऱ्या विराट कोहलीने आपल्या राहून गेलेल्या इच्छेबाबत भाष्य केले आहे. यानंतर विराट कोहलीच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत मोठे यश मिळवले आहे. मात्र, विराट कोहली त्याच्या मनातील एक इच्छा व्यक्त केली, जी कधीच पूर्ण होऊ शकणार नाही.(Virat Kohli’s desire)

विराटने सोशल मीडीयावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने मोठा खुलासा केला आहे. विराट म्हणाला की, मी आता कधीही भारतरत्न, गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भेटू शकणार नाही. मला त्यांच्यासोबत गप्पा मारण्याची इच्छा होती. मला त्यांना भेटून त्यांच्या आयुष्यभराचा प्रवास जाणून घ्यायचा होता. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडीयावर तुफान व्हायरल झाला आहे. त्याने ही इच्छा व्यक्त करत चाहत्यांची मने जिंकली आहेत. (Virat Kohli’s desire)

कोहलीचे झळकावले ३ वर्षानंतर शतक (Virat Kohli’s desire)

आशिया चषक २०२२ मध्ये अफगाणिस्तानविरोधात शतक झळकावत विराट कोहलीने ३ वर्षांचा शतकांचा दुष्काळ संपवला होता. आशिया चषकात शतक झळकावल्यानंतर विराटने मागे वळून पाहिलेले नाही. २०२२ च्या अंतिम टप्प्यात त्याने बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शतक ठोकले होते. तर २०२३ च्या सुरूवातीलाच कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २ शतके झळकावली आहेत. विराटने आजवर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४६ शतक झळकावली आहेत. विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४ शतक झळकावल्यास तो सचिनच्या एकदिवसीय क्रिकेटमधील विक्रमाशी बरोबरी करेल. (Virat Kohli’s desire)

हेही वाचंलत का?

Back to top button