

पुढारी ऑनलाईन डेस्क : एव्हर्टन संघाने हंगामात 20 सामन्यांत फक्त 3 विजय मिळवले तर, 6 सामने अनिर्णित राहिले. तसेच त्यांना 11 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. सध्या गुणतालिकेत एव्हर्टन 15 गुणांसह 19 व्या स्थानावर आहे. त्यामुळे त्यांना प्रीमियर लीगमधून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे निराशाजनक कामगिरीमुळे क्लबने लॅम्पार्डला पदावरून हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. (Frank Lampard )
इंग्लिश फुटबॉल क्लब एव्हर्टनने मॅनेजर फ्रँक लॅम्पार्डची हकालपट्टी केली. इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (ईपीएल) सलग आठ सामने न जिंकल्याने क्लबने मोठा निर्णय घेतला आहे. एव्हर्टनने या मोसमात 20 सामन्यांत फक्त 3 विजय मिळवले आहेत. 6 सामने अनिर्णित राहिले आहेत. त्यांना 11 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. एव्हर्टन 15 गुणांसह 19 व्या स्थानावर आहे. त्याला प्रीमियर लीगमधून बाहेर पडण्याचा धोका आहे.
प्रीमियर लीगमध्ये १८व्या, १९व्या आणि २०व्या क्रमांकावर असलेल्या संघांना प्रीमियर लीगच्या पुढील हंगामात खेळता येत नाही. यांनंतर त्यांना इंग्लंडची द्वितीय श्रेणी लीगमध्ये खेळावे लागते. प्रीमियर लीग पुन्हा खेळण्यासाठी पात्रता फेरी खेळून प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी पात्र व्हावे लागते.
राफेल बेनिटेझच्या जागी करण्यात आली होती नियुक्ती
इंग्लंडमधील महान फुटबॉलपटू मानल्या जाणाऱ्या लॅम्पार्डला गेल्या वर्षी जानेवारीमध्ये मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. राफेल बेनिटेझ यांच्या जागी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. लॅम्पर्डने गेल्या मोसमात एव्हर्टनला लीगमधून बाहेर होण्यापासून वाचवले होते. त्यानंतर संघाची कामगिरी सुधारेल असे वाटत होते, मात्र क्लबने मुख्य स्ट्रायकर ब्राझिलियन रिचार्लिसनला विकून लॅम्पार्डसमोरील अडचणी वाढवल्या. गेल्या वर्षीही संघाची कामगिरी खराब राहिली होती.
गेल्या सामन्यात वेस्ट हॅम विरुद्ध पराभव
एव्हर्टनला गेल्या वर्षी सामन्यात सहा पराभव पत्करावे लागले आहेत. शनिवारी त्यांना वेस्ट हॅमविरुद्ध 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. मॅनेजर म्हणून लॅम्पार्डचा हा शेवटचा सामना ठरला. एव्हर्टनचा पुढील सामना 4 फेब्रुवारी रोजी लीग टॉपर्स आर्सेनल विरुद्ध आहे. त्यानंतर त्याचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी लिव्हरपूलशी होईल होणार आहे.
एव्हर्टन क्लबने एका निवेदनात म्हटले आहे की, फ्रँक लॅम्पार्डने आज वरिष्ठ पुरुषांच्या प्रथम संघ मॅनेजरपदावरून पायउतार झाला आहे. जो एडवर्ड्स, पॉल क्लेमेंट, अॅशले कोल आणि ख्रिस जोन्स यांनीही क्लब सोडला आहे. अॅलन केली गोलकीपिंग कोच राहतील. एव्हर्टनमधील प्रत्येकजण फ्रँक आणि त्याच्या कोचिंग स्टाफचे त्यांच्या सेवेबद्दल आभार मानू इच्छितो. आम्ही फ्रँक आणि त्याच्या बॅकरूम टीमला भविष्यासाठी शुभेच्छा देतो. क्लबने नवीन व्यवस्थापकाचा शोध सुरू ठेवला आहे. नवीन व्यवस्थापकाची नियुक्ती होईपर्यंत पॉल टेट आणि लीटन बेन्स यांच्या मार्गदर्शना खाली क्लबचे प्रशिक्षण होणार आहेत.
हेही वाचा;