Kylian Mbappe : एम्बाप्पेने फ्रेंच कपमध्ये डागले पाच गोल; पीएसजीसाठी रचला इतिहास | पुढारी

Kylian Mbappe : एम्बाप्पेने फ्रेंच कपमध्ये डागले पाच गोल; पीएसजीसाठी रचला इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्क : फ्रेंच स्टार फुटबॉलपटू केलियन एम्बाप्पे दणादण गोल करण्यासाठी ओळखला जातो. गेल्या वर्षाच्या अखेरीस झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध हॅट्ट्रिक झळकावणाऱ्या एम्बाप्पेने(Kylian Mbappe)पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एम्बाप्पेने मंगळवारी फ्रेंच कपमध्ये यूएस पेस डी कॅसलविरुद्धच्या सामन्यात पाच गोल केले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पॅरिस सेंट जर्मेन (PSG)ने हा सामना ७-० ने जिंकला.

या सामन्यात एम्बाप्पेने इतिहास रचला. पॅरिस सेंट-जर्मेनसाठी एकाच सामन्यात पाच गोल करणारा तो पहिला खेळाडू ठरला. पीएसजीने यूएस पेस डी कॅसलचा वाईटरित्या पराभव केला. एम्बाप्पेने पहिल्या हाफमध्ये हॅट्ट्रिक केली. पहिल्या हाफच्या अखेरीस पीएसजीचा संघ ४-० ने पुढे होता. (Kylian Mbappe)

दुसऱ्या हाफमध्ये पीएसजीने तीन गोल केले. यापैकी दोन गोल एम्बाप्पेने केले. या सामन्यात एम्बाप्पे व्यतिरिक्त, नेमार जूनियर आणि कार्लोस सोलर यांनी पॅरिस सेंट-जर्मनसाठी प्रत्येकी एक गोल केला. कर्णधार मार्किनहोसच्या अनुपस्थितीत एम्बाप्पेने संघाची धुरा सांभाळली. अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीला या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती.

राऊंड ऑफ १६ मध्ये मार्सेलशी भिडणार पीएसजी

पीएसजीने सर्वाधिक १४ वेळा फ्रेंच कप जिंकला आहे. राऊंड ऑफ १६ फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी मार्सेलशी होणार आहे. हा सामना ६ फेब्रुवारीला होणार आहे. यानंतर एका आठवड्यानंतर पीएसजी संघ चॅम्पियन्स लीगमध्ये बायर्न म्युनिचविरूध्द सामना होणार आहे. दोन्ही संघांमध्ये प्री-क्वार्टर फायनलमधील पहिल्या लेग -१ मधला सामना रंगणार आहे. यानंतर पीएसजी मार्चमध्ये बायर्न म्युनिकच्या घरच्या मैदानावर लेग-२ चा सामना खेळणार आहे.

हेही वाचा;

Back to top button