

पुढारी ऑनलाईन : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने जवळपास तीन वर्षांच्या कालावधीनंतर वन-डे क्रिकेटमध्ये शतक पूर्ण केले. इदौरच्या होळकर स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वन-डेत हिटमॅनने शतकाचा दुष्काळ संपवला. त्याने तब्बल 1101 दिवसांनंतर वनडेत शतकी खेळी साकारली असून त्याने मोठे विक्रमही मोडीत काढले.