Sania Mirza Announces Retirement : सानिया मिर्झाने जाहीर केली निवृत्तीची नवी तारीख

हैदराबाद; पुढारी ऑनलाईन : भारतीची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने अखेर निवृत्ती जाहीर केली. १६ जानेवारीपासून होणारी ऑस्ट्रेलियन ओपन ही सानियाची शेवटची स्पर्धा असेल. ३६ वर्षांच्या सानिया मिर्झाने ट्विटरवर पोस्ट करून ही माहिती आपल्या चाहत्यांसह तमाम क्रीडा प्रेमी व देशवासियांना दिली. सानिया मिर्झाने याआधी दुबई टेनिस चॅम्पियनशीपनंतर निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आता ती ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीचा शेवट करण्याचे ठरवले आहे. (Sania Mirza Announces Retirement)
सानियाने यापूर्वी १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या WTA 1000 दुबई टेनिस चॅम्पियनशिपनंतर निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता तिने ऑस्ट्रेलियन ओपनद्वारेच आपली कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेतला आहे. सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियन ओपन 2023 मधील महिला दुहेरी स्पर्धेत कझाकिस्तानच्या अना डॅनिलिनासोबत सहभागी होणार आहे. १६ जानेवारीपासून खेळवली जाणारी ऑस्ट्रेलियन ओपन ही सानियाची शेवटची स्पर्धा असेल. सानिया मिर्झाने ट्विटरवर पोस्ट करून ही माहिती दिली. (Sania Mirza Announces Retirement)
सानिया मिर्झाने सांगितले की, ऑस्ट्रेलियन ओपननंतर तिला तिच्या मुलासोबत अधिक वेळ घालवायला आवडेल. तिने लिहिले आहे की, ‘३० वर्षांपूर्वी हैदराबादमधील सहा वर्षांची मुलगी तिच्या आईसोबत पहिल्यांदा कोर्टवर गेली आणि प्रशिक्षकाने टेनिस कसे खेळायचे ते समजावून सांगितले. मला वाटत होते की मी टेनिस शिकण्यासाठी खूप लहान आहे. माझ्या स्वप्नांसाठीचा लढा वयाच्या ६ व्या वर्षीच सुरू झाला होता.
सानियाने पुढे सांगितले की, ‘माझे आई-वडील आणि बहीण, माझे कुटुंब, माझे प्रशिक्षक, फिजिओ आणि चांगल्या आणि वाईट काळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या संपूर्ण टीमच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. मी माझे हसणे-रडणे, सुखदु:ख, वेदना आणि आनंद त्यांच्या प्रत्येकासोबत शेअर केला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानू इच्छितो. माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात तुम्ही सर्वांनी मला मदत केली आहे. हैदराबादच्या या चिमुरडीला तुम्ही स्वप्न पाहण्याची हिंमत तर दिलीच पण ती स्वप्ने पूर्ण करण्यास मदत सुद्धा केली.
Life update :) pic.twitter.com/bZhM89GXga
— Sania Mirza (@MirzaSania) January 13, 2023
अधिक वाचा :
- Suryakumar Yadav : सूर्याला वनडेत कधी खेळवणार? जाणून घ्या किती प्रतीक्षा करावी लागणार
- IND vs NZ T20 : भारताविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर, केन विल्यमसनला विश्रांती
- David Warner Retirement : डेव्हिड वॉर्नरने दिले निवृत्तीचे संकेत, ‘या’ दिवशी घेणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप