महाराष्ट्र राज्य ऑलिंम्पिक स्पर्धा : कुरुंदवाडच्या ईश्वरी पोवारची ब्रांझ पदकावर मोहर | पुढारी

महाराष्ट्र राज्य ऑलिंम्पिक स्पर्धा : कुरुंदवाडच्या ईश्वरी पोवारची ब्रांझ पदकावर मोहर

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : पुणे येथे महाराष्ट्र राज्य ऑलिंम्पिक स्पर्धेत कुरुंदवाड येथील ईश्वरी निशांत पोवार हिने 64 किलो वजनी गटात ब्रांझ पदक मिळाले आहे.

पुणे येथे सुरू असलेल्या ऑलम्पिक स्पर्धेत ईश्वरी पोवार हिने 69 किलो स्नॅच व 89 किलो क्लीन आणि जर्क मध्ये 158 किलो वजन उचलून ब्रांझ पदकाची कमाई केली. यापूर्वी त्याने रावेर जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कुरुंदवाड शहराला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

या स्पर्धेत राज्यभरातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. ईश्वरी पोवार हिने ब्रांझ पदक पटकावून यश संपादन केले आहे. या यशाबद्दल कुरुंदवाडसह परिसरात तिचे कौतुक होत आहे. ईश्वरी हिने राज्यस्तरीय स्पर्धेबरोबर इतर स्पर्धेत ही चमकदार कामगिरी केली आहे. ईश्वरी पोवार हीला प्रशिक्षक विजय माळी,विश्वनाथ माळी यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा 

Back to top button