Hockey WC 2023 : हॉकी विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणार दिमाखात | पुढारी

Hockey WC 2023 : हॉकी विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणार दिमाखात

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेला १३ जानेवारीपासून सुरूवात होत आहे. भारताला सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. याआधीही ही स्पर्धा भारता खेळवली गेली होती. त्यावेळी स्पर्धेतील सामने भुवनेश्वर आणि ओडिशात खेळवण्यात आले होते. यंदाच्या स्पर्धेत भुवनेश्वर आणि राउरकेला येथे सामने होणार आहेत. हॉकी विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ११ जानेवारी रोजी कटक येथील बाराबती स्टेडियमवर होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात ओडिशाची संस्कृती पाहायला मिळणार आहे. यासोबतच तंत्रज्ञानाची जादू ही प्रेक्षकांना दाखवण्यात येणार आहे. संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा अनोखा मेळ या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. कार्यक्रमात अनेक मोठे स्टार्सही सहभागी होणार आहेत. (Hockey WC 2023)

सलग दुसऱ्यांदा हॉकी विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाले आहे. विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १५ देशांतील खेळाडूंना आतापर्यंतच्या सर्वात नेत्रदीपक उद्धाटन सोहळ्याचा आनंद घेता यावा यासाठी सर्व सुविधा केल्या आहेत. यावेळी कार्यक्रमात पारंपरिक ओडिया संगीत आणि नृत्यासोबत नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. हा कार्यक्रम राष्ट्रीय टीव्ही वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे. (Hockey WC 2023)

या सोहळ्यामध्ये रणवीर सिंग आणि दिशा पटानी तसेच ओडिशातील प्रसिद्ध के-पॉप बँड ब्लॅकस्वान यांचे सादरीकरण होणार आहे. तसेच संगीतकार प्रीतम हे हॉकी वर्ल्ड कप २०२३ च्या अधिकृत गाण्यांचे लेखक आणि संगीतकार आहेत, जे बेनी दयाल, नीती मोहन, लिसा मिश्रा, अमित मिश्रा, अंतरा मित्रा, श्रीराम चंद्र, नकाश हे दिग्गज गायक सादरीकरण करणार आहेत. अजीज आणि शाल्मली खोलगडेसोबत ओडिशाची नमिता मेलेका. गुरू अरुणा मोहंती आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्यामक दावर यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. या कार्यक्रमाला अनेक स्थानिक कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा;

Back to top button