कोची; पुढारी ऑनलाईन : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२३ च्या मिनी-लिलावात इंग्लंडचा युवा स्टार फलंदाज हॅरी ब्रूकला १३.२५ कोटी रुपयांना विकत घेण्यात आले. त्याची मूळ किंमत १.५ कोटी रुपये होती. हॅरी ब्रूकसाठी राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात निकराची लढत झाली. शेवटी, सनरायझर्स हैदराबादने ब्रुकला पदारात पाडून घेण्यात यशस्वी ठरला. हॅरी ब्रुकने आतापर्यंत इंग्लंडकडून चार कसोटी, २० टी – २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ब्रुकने अलीकडेच पाकिस्तान दौऱ्यावरील कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली होती. ब्रुकने या कसोटी मालिकेत केलेल्या प्रभावी वेगवान फलंदाच्या जोरावर त्याने जगातील सर्व क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. मात्र हॅरी ब्रुकची डील होताच सनरायझर्स हैदराबादच्या मालकीन असणाऱ्या काव्या मारन यांच्या चेहरवरील खळी खुलल्याचे यावेळी पहायला मिळाले. (IPL 2023 Auction)
SRH ची मालकीन काव्या मारन यंदाच्या लिलवादरम्यान सनरायझर्स हैदराबादच्या टेबलवर खेळाडू खरेदी करताना दिसतल्या. त्यांनी या लिलावाकडे अत्यंत गांभिर्याने लक्ष देत या प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष ठेवत आपल्याला हव्या असणाऱ्या खेळाडुंवर चांगली बोली लावली. जेव्हा त्यांनी इंग्लंडच्या हॅरी ब्रुकला १३.२५ कोटींना विकत घेतले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. ही त्यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बोली होती ज्यात त्यांना यश मिळाले. यानंतर मात्र त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. हॅरीला घेताच त्यांच्या चेहऱ्यावरची खळी खुलली होती. (IPL 2023 Auction)
काव्या मारन या लोकप्रिय व्यक्तींपैकी आहे. साऊथमध्ये त्यांची चांगली लोकप्रियता आहे. त्या सोशल माध्यमांमध्ये सुद्धा सतत चर्चेत असतात. हॅरीला विकत घेतल्यानंतर त्या बातम्यांसह सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. शिवाय त्यांच्या या लूकची सुद्धा चर्चा सुरु आहे. (IPL 2023 Auction)
हॅरी ब्रूकबद्दल बोलायचे झाले तर त्याने चार कसोटीत ९२.१३ च्या स्ट्राइक रेटने आणि ८० च्या सरासरीने ४८० धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतके आणि एका अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, 20 टी – २० सामन्यांतील १७ डावांमध्ये, ब्रूकने १३७.७७ च्या स्ट्राइक रेट आणि २६.५७ च्या सरासरीने एकूण ३७२ धावा केल्या आहेत.
अधिक वाचा :