पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. तो २४ धावा करून तो बाद झाला. परंतु, या २४ धावांसह त्याने कसोटीमध्ये एक विक्रम रचला आहे. हा विक्रम करताच त्याने क्रिकेटचे डॉन समजल्या जाणाऱ्या डॉन ब्रॅडमन या दिग्गज क्रिकेटपटूंना मागे टाकले आहे. ( Cheteshwar Pujara)
या सामन्यापूर्वी चेतेश्वर पुजाराने ९७ कसोटीत ४४.७७ च्या सरासरीने ६९८४ धावा केल्या होत्या. या सामन्यात त्याने १६ धावा करताच ७००० धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा चेतेश्वर पुजारा हा भारतातील ८ वा आणि जगातील ५५ वा खेळाडू ठरला. कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याने महान खेळाडू डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे. त्यांनी ५२ कसोटी सामन्यात ९९.९४ च्या सरासरीने ६९९६ धावा होत्या. त्याचबरोबर पुजाराने ९८ वी कसोटी खेळताना ४४.८८ च्या सरासरीने हा आकडा पार केला आहे. ( Cheteshwar Pujara)
चेतेश्वर पुजाराने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत १९ शतके आणि ३४ अर्धशतके झळकावली आहेत. तो फॉर्ममध्ये येणे ही टीम इंडियासाठीही एक चांगली बातमी आहे. कारण पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत तो संघाचा महत्त्वाचा भाग असणार आहे.
हेही वाचा;