IND vs BAN 2nd Test : शतक हुकलेल्या ऋषभ पंतने केली महेंद्र सिंह धोनीची बरोबरी | पुढारी

IND vs BAN 2nd Test : शतक हुकलेल्या ऋषभ पंतने केली महेंद्र सिंह धोनीची बरोबरी

ढाका; पुढारी ऑनलाईन : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टच्या (Adam Gilchrist) नावावर कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सर्वाधिक 90+ धावा करण्याचा विश्वविक्रम आहे. भारताकडून महेंद्रसिंग धोनी (mahendra singh dhoni) या बाबतीत नंबर 1 होता, पण आता ऋषभ पंतने (Rishabh Pant) त्याची बरोबरी केली आहे. बांगलादेशविरुद्ध 93 धावांवर बाद झालेला पंत 11व्यांदा 90+ धावांवर बाद झाला आहे. अॅडम गिलख्रिस्टने 20 वेळा अशी कामगिरी केली आहे, तर झिम्बाब्वेचा अँडी फ्लॉवर (Andy Flower) 12 वेळा अशी कामगिरी करून दुसऱ्या स्थानावर आहे. पंत आणि धोनी दोघांनीही 11-11 वेळा अशी कामगिरी बजावली आहे. (IND vs BAN 2nd Test)

धोनीने 11 सामन्यांत सहा वेळा शतक केले आहे, तर पंतने पाच वेळा शतक केले आहे. दुसरीकडे, जर आपण गिलख्रिस्टबद्दल बोलायचे म्हटले तर त्याने 20 वेळा 90+ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 17 वेळा शतक गाठले आहे, तर अँडी फ्लॉवर कसोटी क्रिकेटमध्ये कधीही नर्वस 90 चा बळी ठरला नाही. त्याने 90+ 12 वेळा धावा केल्या आणि प्रत्येक वेळी शतक ठोकले. (IND vs BAN 2nd Test)

बांगलादेश विरुद्ध भारत या दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 227 धावांवर गारद झाला होता. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 94 धावांत टॉप-4 फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या. केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर बांगलादेशने टीम इंडियाला अडचणीत आणल्याचे दिसत होते. पण, त्यानंतर पंत आणि अय्यरने मिळून स्कोअर 253 धावांवर नेला. पंत 105 चेंडूत सात चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 93 धावा काढून बाद झाला.

अधिक वाचा :

Back to top button