IPL Auction : निकोलस पुरन ठरला महागडा विकेटकीपर! इशान किशनला टाकले मागे

IPL Auction : निकोलस पुरन ठरला महागडा विकेटकीपर! इशान किशनला टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL Auction nicholas pooran : टाटा आयपीएलच्या मिनी-लिलावात (TATA IPL 2023 ) वेस्ट इंडिजचा विकेटकीपर-फलंदाज निकोलस पूरनने (nicholas pooran) कोट्यवधींची कमाई करत आयपीएल सुरु होण्याआधीच धमाका केला आहे. पुरनची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती, पण त्याचा लिलाव 16 कोटी रुपयांना झाला आणि आयपीएलच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित झाला. त्याला लखनऊ सुपर जायंट्सने 16 कोटी रुपयांना खरेदी केले.

ईशान किशनचा विक्रम मोडीत

लखनौ सुपरजायंट्सने पूरनला 16 कोटींची बोली लावून सर्वांना आश्चर्यचकित केले. यासह ईशान किशनचा विक्रमही मोडीत निघाला. खरे तर पूरन (nicholas pooran) आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा यष्टिरक्षक बनला आहे. पूरनच्या आधी, इशान किशनला आयपीएल 2022 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने 15.25 कोटींना विकत घेतले होते. त्यानंतर ईशान आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा यष्टीरक्षक ठरला होता, पण आता पूरनने इशानला मागे टाकले आहे.

पुरनला घेण्यासाठी चुरस

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सने प्रथम पुरनला खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले. परंतु चेन्नईने 3.20 कोटींची बोली लावून माघार घेतली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने यात उडी घेतली. दिल्ली आणि राजस्थान यांच्यात 7.25 कोटीपर्यंत लढत झाली, पण राजस्थानने माघार घेतली. लखनौने अचानक 7.50 ची पहिली बोली लावून दिल्लीला धक्का दिला. दोघांमध्ये दीर्घ शर्यत झाली, शेवटी लखनौने 16 कोटींची बोली लावून पुरनाला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news