Ronaldo on Messi : रोनाल्डोने दिल्या मेस्सीला स्वप्नपूर्तीच्या शुभेच्छा | पुढारी

Ronaldo on Messi : रोनाल्डोने दिल्या मेस्सीला स्वप्नपूर्तीच्या शुभेच्छा

पुढारी ऑनलाईन डेस्क :   २०१४ मध्‍ये झालेल्‍या फुटबॉल विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात मेस्सीच्‍या अर्जेंटिनाचा जर्मनीविरुद्ध पराभव झाला होता. मात्र यंदाच्‍या विश्वचषक स्पर्धेत मेस्सीने १९८६ नंतर तब्बल ३६ वर्षांनी आपल्या देशासाठी विश्वचषक जिंकला. (Ronaldo on Messi)

फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले. अर्जेंटिनाच्या विजयाची प्रतिध्वनी जगभर ऐकू आली. जगाच्या विविध भागांतील लोकांनी अर्जेंटिनाचा विजय जणू आपलाच संघ असल्यासारखा साजरा केला. (Ronaldo on Messi)

ब्राझीलचा माजी फुटबॉलपटू दिग्गज रोनाल्डो नाझारियोनेही ट्विटरवर अर्जेंटिना आणि लिओनेल मेस्सीच्या कामगिरीचे कौतुक केले. किती अप्रतिम विजय होता असे त्‍यांने म्‍हटलं आहे.  ब्राझील आणि अर्जेंटिना हे फुटबॉलमधील कट्टर प्रतिस्पर्ध्यांपैकी एक असले तरी, रोनाल्डोने कबूल केले की, मेस्सीने विश्वचषक उंचावलेला पाहून ब्राझीलच्या लोकांनाही आनंद झाला.

हेही वाचा;

Back to top button