Parbhani Gram Panchayat Election 2022 : जिंतूर,सेलू तालुक्यात भाजपाचे निर्विवाद वर्चस्व | पुढारी

Parbhani Gram Panchayat Election 2022 : जिंतूर,सेलू तालुक्यात भाजपाचे निर्विवाद वर्चस्व

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : जिंतूर आणि सेलू तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींपैकी 28 ग्रामपंचायतींवर भाजपने झेंडा फडकविला. निकालानंतर सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते. आमदार मेघना साकोरे बोर्डीकर व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मतदारसंघातील करिष्मा कायम असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले. “भाजप पुरस्कृत सर्व विजयी उमेदवारांना विजयाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा देते” अशी प्रतिक्रिया आमदार मेघना बोर्डीकर यांनी निकालानंतर दिली.

जिंतूर तालुक्यामध्ये 32 ग्रामपंचायतींपैकी 22 ग्रामपंचायतींवर आणि सेलू तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींपैकी 6 ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवला. ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे :

जिंतूर तालुका : वाघी धानोरा, माणकेश्वर चारठाणा, देवसडी, दुधगाव, आसेगाव,
केहाळ, वरुड नरसिंह, धोपटवाडी, पिंपळगाव गायके, इटोली, साईनगर तांडा, जांब बुद्रुक, धानोरा देवगाव, बोर्डी सोस, देवगाव धानोरा, मालेगाव दुधना, कवडा, नांदगाव दुधना, राजेगाव, कुंभारी, मांडवा.
सेलू तालुका : शिंदे टाकळी, धामणगाव, राधे धामणगाव, डासाळा, कुपटा, डिग्रस पोळ.

विजयी झालेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी लक्ष्मण बुधवंत, कृष्णा देशमुख, सुनिल भोंबे, दत्ता कटारे, मुन्ना पारवे, आत्माराम पवार, प्रदीप चौधरी, कैलास खंदारे, रामभाऊ राठोड, उत्तम जाधव, अशोक बुधवंत, मनोहर सातपुते, युवराज घनसावंत, केशव घुले आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button