INDvsBAN Test : टीम इंडियाला झटका, रोहितनंतर ‘हा’ वेगवान गोलंदाज बाहेर! | पुढारी

INDvsBAN Test : टीम इंडियाला झटका, रोहितनंतर ‘हा’ वेगवान गोलंदाज बाहेर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsBAN Test : बांगला देश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारताला आणखी एक धक्का बसला आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मानंतर वेगवान गोलंदाज नवदीप सैनीही (navdeep saini) दुस-या कसोटीतून बाहेर पाडला आहे. पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्याला माघार घ्यावी लागल्याचे समजते आहे.

नवदीप सैनीने (navdeep saini) गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात शेवटची कसोटी खेळली होती. तेव्हा भारतीय संघातील खेळाडूंना दुखापतींना सामोरे जावे लागले होते. दरम्यान, बांगलादेश दौऱ्यावर भारत ए संघाकडून खेळताना सैनीने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याचा भारताच्या वरिष्ठ संघात समावेश करून बांगला देश दौ-यासाठी निवड करण्यात आली होती. सैनीला पहिल्या कसोटीच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते, पण त्याला दुस-या कसोटीत खेळवले जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण पोटदुखीच्या त्रासामुळे त्याला दुस-या कसोटीपूर्वीच मायदेशी परतावे लागले आहे. सैनीला पुन्हा एकदा टीम इंडियाकडून कसोटीत पुनरागमन करण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. (INDvsBAN Test navdeep saini ruled out of second test against bangladesh)

दुखापतीतून सावरण्यासाठी सैनी आता एनसीएमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान, बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकातून दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा खेळणार नसल्यचे स्पष्ट केले आहे. वैद्यकीय पथकाच्या म्हणण्यानुसार, त्याच्या बोटाची दुखापत पूर्णपणे बरी होण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. (INDvsBAN Test navdeep saini ruled out of second test against bangladesh)

प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता नाही..

बांगला देश विरुद्ध पहिल्या कसोटीत 188 धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता कमीच आहे. दुखापतीची चिंता नसल्यास, संघ मागच्याच सामन्यातील प्लेइंग 11 सह मैदानात उतरेल. त्यामुळे जयदेव उनाडकट आणि सौरभ कुमार यांसारख्या खेळाडूंना संधीची प्रतीक्षा करावी लागेल. (INDvsBAN Test navdeep saini ruled out of second test against bangladesh)

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ :

केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू ईश्वरन, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट

Back to top button