Argentina Coach : कोण आहेत अर्जेंटीनाचे प्रशिक्षक स्केलोनी? त्यांनी पाठवलेल्या एका 'मेसेज'ने बदलले संघाचे नशीब

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेटिंना संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता रविवार १८ डिसेंबर रोजी अर्जेंटिना आणि फ्रान्स हे संघ विश्वचषकावरील दावेदारीसाठी मैदानात उतरणार आहेत. अर्जेटिना संघाच्या स्वप्नवत कामगिरीमुळे सर्वत्र चर्चा आहे. संघाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांची. त्याने सहा सामन्यांत चार गोल केले. तर तीन असिस्ट (गोल होण्यापूर्वीचा पास ) केले आहेत. सर्वत्र चर्चा मेस्सी होत असली तरी अंतिम फेरीत पोहचण्याचो सारे श्रेय त्याने संघाचे प्रशिक्षक ( Argentina Coach ) लिओनेल स्कालोनी यांना दिले आहे. जाणून घेवूया कोण आहेत स्केलोनी..?
Argentina Coach : मेस्सीला पुन्हा उभे करण्यात मौलाचे योगदान
मेस्सी याने कोपा अमेरिका स्पर्धेतील पराभवानंतर निवृत्ती जाहीर केली होती. मात्र त्याला अद्याप खूप सारे फुटबॉल खेळायचे आहे, असा सांगणारे स्कालोनी होते. मेस्सी याने निवृत्ती माघारी घ्यावी, अशी विनंती र्जेटिनाच्या राष्ट्राध्यक्षांसह देशातील नागरिकांनीही केली होती. मात्र स्कालोनी यांच्या सांगण्यावरुन २०१६ मध्ये मेस्सी अर्जेटिंनाच्या जर्सीत पुन्हा एकदा मैदानात उतरला.
स्कालोनी आणि मेस्सी होते एका संघात !
२००५ मध्ये लिओनेल मेस्सीने संघात पदार्पण केले तेव्हा स्कालोनी अर्जेंटिना संघात होता. २००६ मध्ये मेस्सीने पहिला विश्वचषक सामना खेळला, तेव्हाही स्कालोनी या संघात होते. त्यांनी २०१५ मध्ये निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर ते जॉर्ज सॅम्पाओलीसह सेव्हिला संघाचे सहाय्यक प्रशिक्षक झाले. त्यानंतर याच संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारीही त्यांनी संभाळली होती.
Argentina Coach : अर्जेंटिनाच्या युवा संघाचे प्रशिक्षक
अर्जेंटिनाने अंडर-17 संघाच्या प्रशिक्षणपदाची जबाबदारी २०१७ मध्ये लिओनेल स्कालोनी यांच्याकडे देण्यात आली. यावेळी ४० वर्षीय स्कालोनी यांना वरिष्ठ संघाला प्रशिक्षण देण्याचा अनुभव नव्हता. अनुभवी प्रशिक्षकाला पाचारण करण्याऐवजी अर्जेंटिनाने मुख्य संघाची जबाबदारी कमी दर्जाच्या प्रशिक्षकाकडे सोपवली.
स्कालोनींची निवड आणि दिग्गजांची शंका
तत्कालिन अर्जेंटिना संघाचे प्रशिक्षक सॅम्पाओलीच्या हकालपट्टी झाली. अर्जेंटिना फुटबॉल संघटनेने माजी दिग्गज डिएगो सिमोन, मार्सेलो गॅलार्डो आणि मॉरिसियो पोचेटिनो यांना प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याचा प्रयत्न केला. सॅम्पाओली यांची झालेली अवस्था पाहून या तिघांनीही पद स्वीकारण्यास नकार दिला. अखेर अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने अंडर 17 वर्षांखालील संघाचे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांच्याकडे मुख्य संघाची जबाबदारी सोपवली. विशेष म्हणजे या निर्णयाला अर्जेंटिनाच्या माजी दिग्गजांनी विरोध केला होता. अगदी दिवंगत डिएगो मॅराडोना 2018 मध्ये म्हणाले होते की, “तो ट्रॅफिक संभाळू शकत नाही तो राष्ट्रीय संघाची जबाबदारी कसा हाताळणार. आपण सगळे वेडे झालो आहोत का?
मेस्सीला पाठवलेला मेसेज ठरला होता टर्निंग पाँइंट
मोठ्या प्रमाणावर झालेल्या टीकेकडे दुर्लक्ष करत स्कालोनी यांनी त्याच्या कोचिंग स्टाफची एक टीम एकत्र केली. त्याच्यासोबत अर्जेंटिनाचे माजी स्टार खेळाडू पाब्लो आयमार, वॉल्टर सॅम्युअल आणि रॉबर्टो आयला यांचा समावेश होता. यानंतर लिओनेल मेस्सी याला निवृत्ती रद्द करण्यास भाग पाडण्याचे मोठे आव्हान स्कालोनीसमोर होते. आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळण्यास मेस्सीने नकार दिला होता. स्कालोनीने मेस्सीला व्हॉट्स अॅप मेसेज पाठवला. यामध्ये त्याने म्हटलं होतं की, “हॅलो लिओ, मी स्कालोनी आहे. तुमच्याशी पाब्लो आयमारशी बोलायचे आहे.” मेस्सी लहानपणी आयमरला आपला आदर्श मानायचा. वरिष्ठ खेळाडूंचाही तो आदर करत असे. म्हणूनच या संदेशानंतर तो स्कालोनी आणि आयमरला भेटायला गेला. त्यानंतर तिघांमध्ये चर्चा झाली आणि मेस्सीने खेळण्यास होकार दिला.
स्कालोनीने नंतर ‘ईएसपीएन’ वाहिनीशी बोलताना सांगितले होते की, “मेस्सीने आम्हाला सांगितले की, तो पुनरागमन करण्यास तयार आहे. आम्ही त्याला बोलावले तर तो खेळायला तयार आहे. मेस्सी केवळ आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द वाढवण्याचा निर्धार करत नव्हता, तर त्याला अशा स्पर्धाही जिंकायच्या होत्या, ज्या तो यापूर्वी जिंकू शकला नव्हता”.
अर्जेटिना संघाचा चेहरामोहराच बदलला
अर्जेटिंना संघाचा तीन कोपा अमेरिका आणि एक विश्वचषक स्पर्धेत झालेल्या पराभवानंतर स्कालोनी यांनी संघ बदलण्याचा निर्णय घेतला. मेस्सीकडे असणार्या जबाबदारीची त्यांना जाणीव होती. त्यामुळेच त्यांनी संघात नवीन खेळाडूंची ओळख करून दिली. मेस्सीशिवाय त्यांनी पहिल्या सहापैकी चार मैत्रीपूर्ण सामने जिंकले. यामुळे स्कालोनीचे स्थान भक्कम झाले. 2019 मध्ये, कोपा अमेरिकेच्या उपांत्य फेरीत ब्राझीलविरुद्ध पराभूत झाल्यानंतर अर्जेंटिनाच्या संघाने केलेले जबरदस्त पुनरागमन सर्वानाच आवाक करणारे ठरले होते.
मेस्सीचे पहिले स्वप्न झालं पूर्ण…
अर्जेटिंना संघाने 2021 मध्ये कोपा अमेरिका कप जिंकला. मेस्सीचे पहिले स्वप्न पूर्ण झाले. अर्जेंटिनासोबत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्यात तो यशस्वी ठरला. 28 वर्षात पहिल्यांदाच अर्जेंटिनाने मोठी ट्रॉफी जिंकली होती. स्कॅलोनीचा संघ सलग 36 सामन्यांत हरला नव्हता. मात्र विश्वचषक स्पर्धेत सौदी अरेबियाविरुद्ध संघाचा पराभव झाला. विश्वचषक स्पर्धेतची सुरुवात खराब झाली. तरीही स्कॅलोनी यांना आपल्या संघाच्या कामगिरीवर विश्वास होता. साखळी सामन्यातील पराभवानंतर स्कालोनीने रणनीती बदलली आणि नेदरलँड-क्रोएशियासारख्या बलाढय़ संघाचा पराभव करून अर्जेंटिनाने अंतिम फेरी गाठली आहे. आता फ्रान्स विरुद्धच्या अंमित सामन्यात सर्वांचे लक्ष मेस्सी यांच्याबरोबर त्याचे प्रशिक्षक स्कालोनी यांच्याकडेही असणार आहे.
हेही वाचा :
- FIFA World Cup 2022 : मोरोक्को-क्रोएशिया यांच्यात आज प्लेऑफ लढत
- FIFA WC 2022 : जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघटना; जाणून घ्या फिफाचे आर्थिक समीकरण
- Morocco FIFA WC : पराभवानंतर मोरोक्को खेळाडुंच्या ‘त्या’ कृतीने सर्वच झाले भावूक!