FIFA WC 2022 : जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघटना; जाणून घ्या फिफाचे आर्थिक समीकरण

FIFA WC 2022 : जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघटना; जाणून घ्या फिफाचे आर्थिक समीकरण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०२२ अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात होणार आहे. १८ डिसेंबरला दोन्ही संघ विजेपदासाठी एकमेकांशी झुंजतील. ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला सुमारे ३४७ कोटी रुपये मिळणार आहेत. अंतिम फेरीत दुसरे स्थान पटकावण्याऱ्या संघालासंघाला सुमारे २४८ कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला बक्षिस म्हणून २२३ कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकाचा संघाला २०६ कोटी रुपये दिले जाणार आहेत. (FIFA WC 2022)

फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या प्रत्येक संघाला बक्षीस म्हणून काही रक्कम दिली जाते. फिफा ही जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघटना आहे. या कारणास्तव, फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या संघांना इतर खेळांच्या तुलनेत बक्षीस म्हणून भरघोस रक्कम दिली जाते. फिफा ही एक अशी संस्था आहे. की, ज्यांचा उद्देश खेळाचा विस्तार करणे आणि पैसे कमविणे हे आहे. अशा परिस्थितीत फिफा कशी कमाई करते याबद्दल हे आपण पाहणार आहोत. (FIFA WC 2022)

फिफाचे आर्थिक स्त्रोत –

फिफाच्या उत्पन्नाचे चार स्रोत आहेत. दूरदर्शन हक्क, मार्केटिंग हक्क, परवाना आणि तिकीट विक्री. या माध्यमातून फिफा कोट्यवधी रुपये कमावते. तसेच खेळ जगभर स्पर्धा चालवण्यासाठी, स्पर्धा आयोजित करण्यासाठी आणि खेळाच्या विस्तारासाठी पैसे देते. फिफाचे बहुतेक पैसे हे टेलिव्हिजन हक्कांच्या लिलावातून येतात. फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि लाखो चाहते नेहमी फुटबॉलचे सामने पाहतात. यामुळे, अनेक कंपन्यांनी फिफाच्या टीव्ही हक्कांसाठी बोली लावतात. सर्वाधिक बोली लावणाऱ्याला फिफाचे सामने प्रसारित करण्याचे अधिकार मिळतात. भारतात फिफा विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांचे प्रसारणाचे अधिकार स्पोर्ट्स १८ कडे आहेत. टीव्हीच्या डिजिटल प्रसारणाच्या अधिकारातून फिफा मोठी कमाई करते.

फिफा विश्वचषक स्प इतर अनेक प्रायोजक आहेत, जे सामन्यांदरम्यान त्यांची नावे आणि लोगो प्रदर्शित करण्यासाठी खूप पैसे देतात. फिफा विश्वचषक २०२२ मध्ये विपणन अधिकारांद्वारे फिफाला मोठी रक्कम देखील मिळाली आहे. फिफा विश्वचषक देखील ब्रँड परवाना आणि रॉयल्टीद्वारे भरपूर पैसे कमवतो. याशिवाय ही संस्था भरपूर कमाई करते. प्रत्येक सामन्याच्या तिकिटांच्या विक्रीतूनही फिफाला मोठी रक्कम मिळते. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या तिकिटाची किंमत 15 लाखांच्या जवळपास आहे. यातून मिळणारे उत्पन्नही फिफाला जाते.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news