Neymar Special Message : ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार भारतीय फॅन्सवर 'फिदा'! म्हणाला, 'केरळचे खूप खूप...'

पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळ राज्यातील कोझिकोड जिल्हयातील पुल्वूर नदीमध्ये भव्य कट-आउट उभा केल्याने : ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार याने भारतीय फॅन्सचे आभार मानले आहेत. नेमारने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “जगातील सर्व कलांमध्ये तुम्हाला विशेष प्रेम दिसून येते. खूप खूप धन्यवाद, केरळ, भारत”. ( Neymar Special Message )
यापूर्वी ‘फिफा’ने पुल्वूर नदीतील नदी पात्रात उभारलेला नेमारच्या कटआउट्सचा फोटो ट्विट केला होता. केरळमधील फुटबॉल ‘फिव्हर’वर भाष्य करताना म्हटलं होतं की, केरळ अणि केरळवासीयांनी नेहमीच फुटबॉलवर प्रेम केले आहे. कतारमधील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेवेळीही तुम्ही तुमi-rh आवडत्या खेळाबद्दल दाखलेल्या आपुलकीबद्दल धन्यवाद. ( Neymar Special Message )
यंदाच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलचा क्रोएशियाकडून पराभव झाला होता. या पराभवामुळे भारतातील ब्रीझल संघाचे फॅन्सही व्यथित झाले होते. विश्वचषक स्पर्धेत बाहेर पडल्यानंतर नेमार यानेही “ब्राझीलकडून यापुढे खेळणार की नाही याची खात्री नसल्याचे म्हटलं होतं. सध्या तरी मी सरळसोट विचार करत नाही, असे दिसतय. हा शेवट आहे असे म्हणणे घाईच होईल. मला सध्या तरी कशाचीच हमी देता येत नाही.पुढे काय होते ते पाहूया, असेही त्याने यावेळी नमूद केले होते.
View this post on Instagram
हेही वाचा :
- FIFA World Cup 2022 : मोरोक्को-क्रोएशिया यांच्यात आज प्लेऑफ लढत
- FIFA Golden Boot : मेस्सी ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत पिछाडीवर, जाणून घ्या समीकरण
- Morocco FIFA WC : पराभवानंतर मोरोक्को खेळाडुंच्या ‘त्या’ कृतीने सर्वच झाले भावूक!