Big Bash League : ‘या’ संघाचा १५ धावांत ऑलऑऊट; टी २० मध्ये रचला इतिहास | पुढारी

Big Bash League : ‘या’ संघाचा १५ धावांत ऑलऑऊट; टी २० मध्ये रचला इतिहास

सिडनी; पुढारी ऑनलाईन : क्रिकेटमधील टी २० प्रकार दिवसेंदिवस आणखी रोमांचक बनत चालला आहे. त्यामुळे या प्रकाराकडे खेळाडुंसह प्रेक्षकांचा ओढा अधिकच वाढत आहे. जशी या सामन्यांकडे ओढा वाढत आहे तसेच या टी २० प्रकाराच्या सामन्यात दिवसांगणिक नव नवे विक्रम प्रस्तापित होत आहे. त्यामुळे हा प्रकार आणखी आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत आहे. सध्या ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बिग बॅश टी २० क्रिकेट लीगमध्ये असा एक अनोखा विक्रम रचला गेलाय. त्यामुळे सारेच जण अवाक झाले आहेत. (Big Bash League)

शुक्रवारी बीग बॅश लिगमध्ये खेळविण्यात आलेल्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर अवघ्या १५ धावात सर्वबाद होण्याची नामुष्की ओढावली. एखाद संघ अवघ्या १५ धावा ऑलऑऊट होण्याची ही क्रिकेट इतिहासातील पहिलीच घटना आहे. ॲडिलेड स्ट्रायकर्स विरुद्ध सिडनी थंडर्स असा सामना सिडनी शोग्राऊंड मैदानावर खेळविण्यात आला. या सामन्यात सिडनी थंडर्सचा संपूर्ण संघ ५.५ षटकात ऑलऑऊट झाला. या पुर्वी ऑगस्ट २०१९ मध्ये तुर्कीचा संघ २१ धावांवर ऑलऑऊट झाला होता. सिडनी थंडर्सच्या नावाची आता क्रिकेट इतिहासात नको त्या विक्रामासाठी नोंद झाली आहे. (Big Bash League)

ॲडलेड स्ट्रायकर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत सिडनी थंडर्स समोर निर्धारित षटकात ९ बाद १३० धावा करत १४० धावांचे आव्हान ठेवले. ॲडलेड स्ट्रायकर्सचे आव्हान स्विकारत मैदानात उतरलेल्या सिडनी थंडर्सच्या फलंदाजांनी केवळ हजरी लावण्याचीचे काम केले. त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. तर निम्मासंघ म्हणजे पाच फलंदाज शुन्यावर बाद झाले. त्यांच्यातील ब्रॅडेन डॉगेट याने केलेल्या ४ धावा या वैयक्तीक सर्वाधिक धावा ठरल्या. इतक्या लाजिरवाण्या पद्धतीचा खेळ हा सिडनी थंडर्स संघाकडून खेळला गेला.(Big Bash League)

तर दुसरी ॲडलेड स्ट्रायकर्सच्या गोलंदाजांची कामगिरी थक्क करणारी ठरली असे म्हणावे लागले. त्यांच्या फक्त तीच गोलंदाजांनी गोलंदाजी केली. हेन्री थॉम्टन याने २.५ षटके टाकले. यात त्याने १ षटक मेडन टाकत फक्त ३ धावा दिल्या आणि तब्बल ५ फलंदाज बाद केले. वेस अगर याने २ षटकात ६ धावा देत ४ बळी घेतले. तर तिसरा गोलंदाज मॅथ्यू शॉर्ट याने १ षटक टाकत ५ धावा दिल्या आणि १ बळी मिळवला. ५.५ षटकात त्यांनी सिडनी थंडर्सचा अवघा संघ तंबुत पाठवला. एकप्रकारी जादुई कामगिरीच ॲडलेच्या या तीन गोलंदाजांनी करुन दाखवली.

बिग बॅश लिगमधला सुद्धा हा सर्वात निच्चांकी स्कोर आहे ज्यामध्ये अवघा संघ बाद झाला. यापुर्वी बीगबॅशमध्ये जानेवारी २०१५ साली मेलबर्न रेनेगेड्सचा संघ ५७ धावात बाद झाला होता. तर सिडनी थंडर्स याच संघाचा विचार केला तर २०१४ साली हॉबर्ट हॅरिकन्स या संघाविरुद्ध खेळताना त्यांचा संपूर्ण संघ ९४ धावांत बाद झाला होता.


अधिक वाचा :

Back to top button