पुढारी ऑनलाईन डेस्क : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यान फुटबॉल चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. कोलंबियाचा स्टार मिडफिल्डर आंद्रेस बालांटा यांचे निधन झाले आहे. या फुटबॉलपटूचे वय अवघे २२ वर्षे होते. पुढील महिन्यात म्हणजेच १८ जानेवारीला तो त्याचा २३ वा वाढदिवस साजरा करणार होता. बहुतेक खेळाडू वयाच्या 22 व्या वर्षी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात करतात, परंतु आंद्रेस बालांटासोबत ही दुःखद घटना घडली आणि त्याने जगाचा निरोप घेतला. आंद्रेस बालांटा अर्जेंटिनाच्या फर्स्ट डिव्हिजन क्लब अॅटलेटिको टुकुमनकडून खेळत होता. (FIFA World Cup)
क्लब संघाचे सराव सत्र सुरू असताना मंगळवारी (२९ नोव्हेंबर) अँड्रेसचाअपघात झाला. यादरम्यान त्याला आपला जीव गमवावा लागला. वास्तविक, आंद्रेस प्रशिक्षणादरम्यान खाली पडला होता. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. क्लबच्या वैद्यकीय कर्मचार्यांनी बालांटावर प्राथमिक उपचार करून तत्काळ रुग्णालयात दाखल केले. यानंतर उपचारादरम्यान डॉक्टरांनी अँड्रेसचे प्राण वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही आणि बलंटाने अखेरचा श्वास घेतला. (FIFA World Cup)
अॅटलेटिको टुकुमन क्लबने नुकतीच सुट्टी साजरी करून विश्रांतीनंतरचे पहिले सराव सत्र आयोजित केले होते. मात्र यादरम्यान बालांटाचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेनंतर अॅटलेटिको क्लबचे अधिकारी इग्नासियो गोलोबिस्की म्हणाले, 'अँड्रेस बालांटा यांच्या मृत्यूबद्दल कळवताना अत्यंत दु:ख होत आहे. क्लबचे सर्व समर्थक खूप निराश झाले आहेत. त्याच्या कुटुंबीयांसह आमच्या क्लबचे मोठे नुकसान झाले आहे. या दुःखातून सावरण्यासाठी बलांटाच्या कुटुंबीयांना शक्ती देवो हीच आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो.'
आंद्रेस बालांटा जुलै 2021 मध्ये अॅटलेटिको क्लबमध्ये सामील झाला. यापूर्वी तो कोलंबियन क्लब डेपोर्टिवो कालीकडून खेळत होता. बालांटाने 2019 मध्ये या कोलंबियन क्लबमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तो कोलंबियाच्या अंडर 20 संघाचा भाग राहिला आहे. 2019 मध्ये इंडोनेशियामध्ये झालेल्या अंडर-20 विश्वचषक स्पर्धेत त्याने आपल्या कोलंबिया संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
हेही वाचा;