पुढारी; ऑनलाईन डेस्क : मोरोक्कोने फुटबॉल वर्ल्ड कपच्या ग्रुप एफ मधील सामन्यात कॅनडाचा २-१ ने पराभव केला. या विजयासह मोरोक्को संघाने राऊंड ऑफ १६ मध्ये आपले स्थान पक्के केले आहे. १९८६ नंतर मोरोक्को राऊंड ऑफ १६ फेरीत पोहोचला आहे. मोरोक्कोला राऊंड १६ मध्येप्रवेश मिळण्यासाठी हा सामना बरोबरीत सोडवणे किंवा सामन्यात विजय मिळवणे आवश्यक होते. या सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांत सात गुणांसह ते गटात अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. (FIFA WC 2022)
हकीम झिएच आणि युसेफ एन-नेसरी या स्टार खेळाडूंच्या गोलमुळे मोरोक्कोला राऊंड ऑफ १६ मध्ये आपले स्थान निश्चित करण्यात मदत झाली. त्यांनी हा सामना २-१ ने जिंकला. मोरोक्को संघ १९८६ नंतर प्रथमच राऊंड ऑफ १६पोहोचला आहे. ते सहाव्यांदा वर्ल्ड कपमध्ये खेळत आहेत. (FIFA WC 2022)
मोरोक्को आणि कॅनडा यांच्यात झालेल्या सामन्यात चौथ्याच मिनिटाला हाकिम झिएचने गोल करत संघाचे खाते उघडले. त्याच्या गोलमुळे मोरोक्को संघाने सामन्यात १-० ने आघाडी घेतली.
मोरोक्कोच्या हकीम झिएचने केलेल्या गोलनंतर मोरोक्कोने आक्रमक वित्रा घेतला. यावेळी त्यांनी गोल करण्याची चांगली संधी निर्माण केली. या संधीचा फायदा घेत युसेफ एन नेसरीने सामन्याच्या २४ व्या मिनिटाला गोलकरत संघाची आघाडी दुप्पट केली. या गोलमुळे मोरोक्कोची सामन्यावरील पकड मजबूत झाली.
सामन्याच्या ४० व्या मिनिटाला मोरोक्कोने स्वयं गोल केला. मोरोक्कोच्या नायफ अगुइर्डेने चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात स्वत:च्या गोलपोस्ट मारला. या स्वत:च्या गोलमुळे कॅनडाला १ गोल मिळाला. त्यामुळे मोरोक्कोने स्वताची आघाडी कमी केली.
हेही वाचा;