पुढारी ऑनलाईन डेस्क : फ्रान्सची स्टेफनी फ्रापार्ट ही इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाली आहे. गुरुवार १ डिसेंबर रोजी कतारमधील अल बायत स्टेडियमवर जर्मनी आणि कोस्टारिका आमने-सामने असतील। या सामन्यात स्टेफनी ही रेफ्री ( पंच ) म्हणून मैदानात उतरेल. ( FIFA WC First Female Referee ) पुरुषांच्या फूटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत पहिली महिला रेफ्री होण्याचा बहुमान तिला मिळणार आहे. पुरुषांच्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिली महिला ठरणार आहे.
गुरुवारी ई ग्रुपमधील जर्मनी आणि कोस्टारिका यांच्यात सामना होईल. या सामन्यात फ्रेंचची ३८ वर्षीयस्टेफनी फ्रापार्ट रेफ्री म्हणून मैदानात उतरणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी तिने लीग १ आणि युईएफए चॅम्पियन्स लीगमध्येही पंच म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. यावेळीही अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला ठरलीहोती.
पुरुष फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा ही जगातील सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध स्पर्धांपैकी एक आहे. मी यापूर्वी फ्रान्स आणि युरोपमध्ये पुरुषांच्या स्पर्धेत मी रेफ्री म्हणून भूमिका पार पाडली आहे. सामना कसा पार पाडायचा याची मला माहिती आहे, असे स्टीफनी फ्रापार्टने FIFA.com च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
फूटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी फिफा रेफ्री ( पंच ) समितीचे अध्यक्ष पियर्लुइगी कोलिना यांनी स्पष्ट केले होते की, २०२२ च्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये तीन महिला रेफ्री असतील. त्या महिला आहेत म्हणून त्यांची निवड झालेली नाही तर उत्कृष्ट रेफ्री असल्याने त्यांची निवड झाली आहे.
हेही वाचा :