FIFA WC Netherlands vs Qatar : यजमान कतार विश्वचषका बाहेर; नेदरलँड राऊंड ऑफ १६ मध्ये | पुढारी

FIFA WC Netherlands vs Qatar : यजमान कतार विश्वचषका बाहेर; नेदरलँड राऊंड ऑफ १६ मध्ये

दोहा (कतार); पुढारी ऑनलाईन : यजमान कतारचा फुटबॉल विश्वचषकाच्या अ गटातील शेवटच्या सामन्यात नेदरलँड्सकडून पराभव झाला. नेदरलँड्सने हा सामना 2-0 ने जिंकून राऊंड ऑफ 16 मध्ये आपले स्थान निश्चित केले. तो 11व्यांदा अंतिम 16 मध्ये पोहोचला आहे. शेवटच्या वेळी तो 2014 मध्ये बाद फेरीत गेला होता. 2018 मध्ये, नेदरलँड्स पात्र ठरू शकला नाही. दुसरीकडे यजमान कतारला या विश्वचषकात एकही सामना जिंकता आला नाही. सलग तीन सामन्यांत त्यांचा पराभव झाला. (FIFA WC Netherlands vs Qatar)

यजमानपद भूषवताना कतार संघाला स्पर्धेत एकही सामना जिंकता आला नाही. यजमान देशाचा हा सलग तिसरा पराभव आहे. यापूर्वी कतारला इक्वाडोर आणि सेनेगलकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. कतार हे पहिले यजमान राष्ट्र ठरले, ज्याला गट फेरीत एकही विजय नोंदवता किंवा सामना अनिर्णित ठेवता आला नाही. याआधी 2010 मध्ये, दक्षिण आफ्रिका त्यांच्या यजमानपदाच्या गट फेरीतून बाहेर पडणारा पहिला देश ठरला होता. मात्र, त्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने एक सामना जिंकला होता व एक गमावला आणि एक सामना अनिर्णित राहिला होता. (FIFA WC Netherlands vs Qatar)

नेदरलँड्सने हा सामना 2-0 ने जिंकला. त्यांच्यासाठी कोडी जक्पो आणि फ्रँकी डी जोंग यांनी गोल केले. नेदरलँड सात गुणांसह अ गटात अव्वल स्थानी आहेत. त्याचवेळी सेनेगलचा संघ सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर तर इक्वाडोरचे तीन सामन्यांत चार गुण झाले आहेत. राऊंड ऑफ 16 मध्ये नेदरलँड्सचा सामना ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाशी होईल.


अधिक वाचा :

Back to top button