FIFA WC Ecuador vs Senegal : २० वर्षानंतर सेनेगलचा प्री-क्वार्टरमध्ये प्रवेश; इक्वाडोरचा २ - १ ने केला पराभव | पुढारी

FIFA WC Ecuador vs Senegal : २० वर्षानंतर सेनेगलचा प्री-क्वार्टरमध्ये प्रवेश; इक्वाडोरचा २ - १ ने केला पराभव

दोहा (कतार); पुढारी ऑनलाईन : कतार फूटबॉल विश्वचषकाच्या अ गटात सेनेगलने इक्वेडोरवर 2-1 अशी मात केली. हा रोमांचक सामना जिंकून सेनेगलने राऊंड ऑफ 16 मधील आपले स्थान पक्के केले आहे. 20 वर्षांनंतर त्यांना ग्रुप स्टेजमधून पुढे जाण्याची किमया साधता आली. 2002 मध्ये सेनेगाल संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. दुसरीकडे या पराभवाने इक्वाडोर संघाचे स्वप्न भंगले आहे. हा सामनाही त्यांनी ड्रॉ करण्यात यश मिळवले असते तर त्यांना पुढे जाण्याची संधी मिळाली असती.2006 मध्ये इक्वाडोरने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. (FIFA WC Ecuador vs Senegal)

सेनेगलने आपला स्टार खेळाडू सॅडियो मानेच्या अनुपस्थितीतही चमकदार कामगिरी करत राऊंड ऑफ 16 मधील आपले स्थान निश्चित केले. त्यांनी करो या मरोच्या सामन्यात इक्वाडोरचा 2-1 असा पराभव केला. सेनेगलसाठी इस्माइला सर आणि कर्णधार कौलिबली यांनी गोल केले. (FIFA WC Ecuador vs Senegal)

सेनेगल 20 वर्षांनंतर ग्रुप स्टेजच्या पुढे जाण्यात यशस्वी झाला आहे. 2002 मध्ये सेनेगल संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तर, 2018 मध्ये तो गट फेरीतून बाहेर पडला होता. दुसरीकडे इक्वाडोर संघाचे स्वप्न भंगले. हा सामनाही त्यांनी ड्रॉ करण्यात यश मिळवले असते तर थोडी फार संधी मिळाली असती. 2006 मध्ये इक्वाडोरने प्री-क्वॉटरमध्ये पोहचण्यात यश मिळवले होते.

अधिक वाचा :

Back to top button