FIFA World Cup : युवकांमधील फुटबॉल वर्ल्डकपची ‘क्रेझ’ इस्लामविरोधी; केरळमधील मुस्लिम नेत्यांचे विधान | पुढारी

FIFA World Cup : युवकांमधील फुटबॉल वर्ल्डकपची 'क्रेझ' इस्लामविरोधी; केरळमधील मुस्लिम नेत्यांचे विधान

पुढारी ऑनलाईन: सध्या फुटबॉल वर्ल्डकप सुरू असल्याने जगभरातील तरुणांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. अशीच क्रेझ केरळमधील काही युवकांमध्येही पाहायला मिळत आहे. यावर केरळमधील एका मुस्लिम संघटनेने टीका केली आहे. युवकांमध्‍ये फिफा विश्वचषकाची क्रेझ, फुटबॉल खेळाडूंची पूजा करणे हे इस्लामविरोधात असल्याचे येथील मुस्लिम नेत्‍याने म्‍हटलं.  यानंतर केरळातील अनेक मुस्लिम नेत्यांनी युवकांमध्‍ये असणार्‍या फुटबॉल क्रेझवर टीका केली आहे.

समस्थ केरळ जाम-इय्यातुल उलामा अंतर्गत कुतुबा समितीचे सरचिटणीस नासर फैझी कूदाथयी यांनी केरळातील युवकांच्या फुटबॉल क्रेझबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी शहरातील फुटबॉल चाहत्यांकडून अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी, पोर्तुगालचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि ब्राझीलचा नेमार ज्‍युनिअर यांच्या उभारण्यात आलेल्या कटआउटवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केल्याबद्दल चिंता देखील व्यक्त करण्यात आली केली.

याविषयी बोलताना, समस्थ केरळ जाम-इय्यातुल उलामा संघटनेच्या मौलवींनी म्हटलं आहे की, अनेक देशांची वसाहत असलेल्या पोर्तुगालचा ध्वज फडकवणे योग्य नाही. फुटबॉलच्या आवडीखातर भारतीयांनी इतर राष्ट्रांच्या ध्वजांचा आदर करणे आणि ते फडकवणे योग्य नसल्याचे म्हणत त्यांनी केरळातील फुटबॉल प्रेमींवर टीका केली आहे. तसेच मुस्लिम नेत्यांनी फुटबॉल खेळांमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासातील रस कमी होत असल्याची खंत व्यक्त करत, कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा  वर्ल्डकपवर टीका केली आहे.

हेही वाचा

Back to top button