सेनगाव; पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील उटी ब्रह्मचारी येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे सोयाबीनचे ४० कट्टे चोरट्यांनी लंपास केले होते. याप्रकरणी शिवाजी कारवरखे यांच्या फिर्यादीवरून सोमवारी (ता.२०) अज्ञातांविरोधात सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोघांना हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह अटक केली.विठ्ठल संभाजी चव्हाण (वय २२, रा.सावंगी म्हाळसा ता.जिंतूर), माधव उर्फ कैलास सिंग बयास (वय १९ रा.उटी ब्रह्मचारी ता.सेनगाव) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उटी ब्रम्हचारी येथील शिवाजी कावरखे यांच्या शेतात पत्र्याचा शेड आहे. रविवारी चोरट्यांनी शेडचे कुलूप तोडून दोन लाख रुपये किमतीचे सोयाबीनचे ४० कट्टे ट्रॅक्टरमध्ये भरून लंपास केले होते. याबाबत सोमवारी अज्ञातांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासात मुद्देमालासह दोघा चोरट्यांना अटक केली.
हेही वाचा :