जामखेड तालुक्यात राजकीय भूकंप ! राष्ट्रवादीच्या 200 कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश | पुढारी

जामखेड तालुक्यात राजकीय भूकंप ! राष्ट्रवादीच्या 200 कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जामखेड : पुढारी वृत्तसेवा :  जामखेड तालुक्यातील राजुरी, डोळेवाडी, एकबुर्जीवस्ती, घुलेवस्ती, बांगरवस्ती आणि खर्डा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 200 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रविवारी (ता.20) चौंडी येथे आमदार प्रा. राम शिंदे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. जामखेड तालुक्यात राजकीय भूकंप झाल्याने मोठी खळबळ उडाली. या राजकीय भुकंपामुळे राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडलेे. जामखेड तालुक्यात आलेल्या राजकीय भूकंपाचे केंद्रबिंदू राजुरी होते. राजुरीला राष्ट्रवादीचा मजबूत बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. मात्र या बालेकिल्ल्याला मोठे भगदाड पडले आहे.

राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय भूकंप झाला. राजुरी गावातील बडे राजकीय प्रस्थ माजी सरपंच सुभाष काळदाते यांनी आपल्या 200 समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. जामखेड तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार प्रा. राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार राम शिंदे यांनी माजी सरपंच सुभाष काळदाते यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे स्वागत केले. यावेळी आमदार राम शिंदे यांनी राजुरीकरांशी संवाद साधला. ग्रामपंचायत निवडणुकीत आपला पॅनल बहुमताने निवडून आणा, तुमच्या पाठीशी सर्व ताकद लावू, गावाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे, असा शब्द आमदार प्रा. शिंदे यांनी दिला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, भाजप जिल्हा कोषाध्यक्ष आजीनाथ हजारे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, पांडुरंग उबाळे, प्रवीण चोरडिया, डॉ. अल्ताफ शेख, प्रसिद्धी प्रमुख आप्पासाहेब ढगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.  रविवारी (ता.20) चौंडीत पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात राजुरीचे माजी सरपंच सुभाष काळदाते, राष्ट्रवादीचे युवा नेते संभाजी कोल्हे, माजी ग्रामपंचायत सदस्य नाना काळदाते, साहेबराव काळदाते, शिवदास कोल्हे, माजी उपसरपंच सुरेश खाडे, सोसायटी संचालक बाळासाहेब मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल काळदाते, जयराम काळदाते, रमेश काळदाते, रघुनाथ फुंदे, विक्रम काळदाते, राहुल खाडे, अक्षय काळदाते, आप्पा राऊत, गणेश काळदाते, पप्पू गायकवाड, अशोक काळदाते, सागर फुंदे, राहुल पुलावळे, राम काळदाते, राजू पवार, गोकुळ अवताडे, गोटू लटपटे, नितीन मोरे, सागर काळदाते, किरण घुले, वैजीनाथ डोळे, भरत डोळे, नासीर शेख, अक्षय सपकाळ, सोनू साळवे, विशाल शिंदे, राहूल काळदाते, गणेश काळदाते, आमित राऊत, सुधीर राऊत, अजय कोल्हे, विकास कोल्हे, लाला काळदाते, अनिरुद्ध सपकाळ, आबा सदाफुले, किशोर सदाफुले, सुधीर सदाफुले, साईनाथ मोरे, अविनाश रेडे, गणेश औताडे, शंकेश्वर कोल्हे, रघुनाथ काळदाते, अनिकेत काळदाते आदींसह 200 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

कायम अपमानास्पद वागणूक

कायम अपमानास्पद वागणुकीला कंटाळून आम्ही पुन्हा नव्या जोमाने आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचे ठरवून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आमच्याकडून जी चूक 2019ला झाली, त्याची दुरुस्ती 2024 ला करूनच दाखवू, असा जाहीर निर्धार राजुरी, डोळेवाडी, एकबुर्जी, घुलेवस्ती, बांगरवस्ती आणि खर्डा परिसरातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

राजुरी, डोळेवाडी, एकबुर्जी, घुलेवस्ती, बांगरवस्ती आणि खर्डा परीसरातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांचे मी स्वागत केले. या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देतानाच त्या भागातील प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार.
                                                                                     – प्रा.राम शिंदे, आमदार

भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर, आमदार प्रा. राम शिंदे त्यांच्या नेतृत्वात गावाचा विकास करणार असल्याचा निर्धार आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केला आहे.

Back to top button