शेवगाव : तालुक्यात अपहार झालेल्या आठ ग्रामपंचायतीपैकी पाच ग्रामपंचायतीची 10 लाख रुपये वसुली प्रलंबित असून, एकट्या शेवगाव ग्रामपंचायतीची नऊ लाखांची वसुली गेल्या तीस वर्षांपासून प्रलंबित आहे. यातील काही ग्रामसेवक मयत झाल्याने शासनाची वसुलीचे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यात 94 ग्रामपंचायतीपैकी शेवगाव,भातकुडगाव, वरखेड, कोळगाव, बोडखे, ताजनापूर, गोळेगाव, सामनगाव ग्रामपंचायतीत 1972पासून 1998पर्यंत ग्रामनिधी, पाणीपुरवठा, तसेच अन्य योजनेत कायम व संशयीत, असा 22 लाख 37 हजार 920 रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले होते.
शासनाने या रकमेची वसुली करण्याच्या सूचना दिल्याने टप्याटप्याने 12 लाख सह हजार सात रुपयांची वसुली करण्यात आली. मात्र, गेल्या तीस वर्षांपासून शेवगाव, भातकुडगाव, बोडखे, ताजनापूर, गोळेगाव या पाच ग्रामपंचायतीकडे नऊ लाख 77 हजार 913 रुपये अपहारीत रक्कम वसुल करणे प्रलबिंत आहे. एकट्या शेवगाव ग्रामपंचायतीत वेळोवेळी 10 लाख 97 हजार 168 रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले होते. पैकी फक्त दोन लाख 28 हजार 849 रुपयांची वसुली करण्यात आली असून, आठ लाख 68 हजार 319 रुपये वसुली अद्यापही प्रलंबित आहे. या ग्रामपंचायतीत सर्वात जास्त 1988 – 89 मध्ये सह लाख 77 हजार 193 रुपये, 1994 -95मध्ये तीन लाख 16 हजार 117 रुपये अपहार झाला होता. यातील फक्त एक लाख 25 हजार रुपये वसुल झाले, तर 1988 -89मध्ये झालेल्या अपहारास जबाबदार असणारे न्यायप्रविष्ठ ग्रामसेवक मयत झाल्याने सहा लाख 60 हजार 757 रुपये बुडीत झाल्यात जमा आहे. आता, ग्रामपंचायत बरखास्त होऊण सात वर्षांपासून नगरपरिषद झाल्याने अपहारीत वसुलीस पूर्ण विराम दिल्यागत आहे.
भातकुडगाव ग्रामपंचायतीच्या 24 हजार 660 अपहारीत रकमेतील आठ हजार 910 वसुली प्रलबींत असून, सदर ग्रामसेवक मयत झाल्याने ही रक्कम बुडीत झाली. बोडखे ग्रामपंचायत नऊ हजार 571 रुपये, ताजनापूर आठ हजार 400 रुपये, गोळेगाव 82 हजार 713 रुपये अपहार रक्कम वसुल करणे