राहुल द्रविड होणार टीम इंडियाचे प्रशिक्षक?, सौरभ गांगुलींचा मोठा खुलासा

कोलकाता ;पुढारी ऑनलाईन: भारतीय क्रिकेट संघाच्‍या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड यांची नियुक्‍ती होणार का, यावर मोठा खल सुरु आहे. टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघांचे प्रशिक्षण म्‍हणून रवि शास्‍त्री यांचा कार्यकाळ संपणार आहे. रवि शास्‍त्री यांच्‍यानंतर राहुल द्रविड यांच्‍याकडे भारतीय क्रिकेट संघाच्‍या प्रशिक्षणपदाची सूत्रे दिली जातील, अशी चर्चा सुरु असताना याबाबत बीसीसीआयचे अध्‍यक्ष सौरभ गांगुली यांनी मोठा खुलासा केला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार विरोट कोहली आणि प्रशिक्षण रवि शास्‍त्री यांनी आतापर्यंत संघाला अनेक मालिकांमध्‍ये विजय मिळवून दिला आहेत. मात्र आतापर्यंत त्‍यांना आयसीसीच्‍या एकाही स्‍पर्धेचे विजेतेपद मिळविण्‍यात यश आलेले नाही.

आता युएई आणि ओमानमध्‍ये होणार्‍या टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धा विराट कोहली आणि रवि शास्‍त्री यांच्‍यासाठी महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे. या स्‍पर्धेनंतर या दोघांच्‍या पुढील वाटचालीचे भवितव्‍य ठरणार आहे. मात्र याबाबत बीसीसीआयने अद्‍याप कोणातेही अधिकृत विधान केलेले नाही.

टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघांचे प्रशिक्षण म्‍हणून रवि शास्‍त्री यांचा कार्यकाळ संपणार आहे. सूत्रांच्‍या माहितीनुसार, शास्‍त्री हेही प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवून मिळावा यासाठी इच्‍छूक नाहीत.

अशातच राहुल द्रविड यांच्‍याकडे भारतीय क्रिकेट संघाच्‍या प्रशिक्षणपदाची सूत्रे दिली जातील, अशी चर्चा सुरु झाली आहे. यावर बीसीसीआयचे अध्‍यक्ष सौरभ गांगुली यांनी मोठा खुलासा केला आहे.

वेळ येईल तेव्‍हा चर्चा करु

याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये सौरभ गांगुली यांनी म्‍टहले आहे की,

भारतीय क्रिकेट संघाच्‍या प्रशिक्षकपदा संदर्भात राहुल द्रविड यांच्‍याशी चर्चा झालेली नाही.

द्रविड हा सलग काही काळासाठी ही जबाबदारी घेण्‍यास सध्‍या तरी तयार दिसत नाही. यासंदर्भात अद्‍याप सविस्‍तर चर्चा झालेली नाही. वेळ येईल तेव्‍हा आम्‍ही याबाबत चर्चा करु.

राहुल द्रविड हे सध्‍या राष्‍ट्रीय क्रिकेट ॲकडमीचे (एनसीए) संचालक आहेत.

त्‍यांनी २०१८ मध्‍ये १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक म्‍हणून जबाबदारी पार पाडली आहे.

यावेळी पृथ्‍वी शॉ कर्णधार असणार्‍या संघाने विश्‍वचषक पटकावला होता.

अलिकडेच द्रविड यांनी श्रीलंकेच्‍या दौर्‍यावर प्रशिक्षक पदाची जबाबदारी पार पाडली होती.

त्‍यामुळेच रवि शास्‍त्री यांच्‍या नंतर भारतीय क्रिकेट संघाच्‍या प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहुल द्रविड यांच्‍यावर सोपवली जाईल, अशी चर्चा सुरु आहे.

हेही वाचलं का ? 

व्‍हिडिओ

 

 

 

Back to top button