Jos buttler : सेमी फायनलआधी इंग्‍लंडच्‍या कॅप्‍टनचे मोठे विधान, “भारत-पाकिस्‍तान फायनल…” | पुढारी

Jos buttler : सेमी फायनलआधी इंग्‍लंडच्‍या कॅप्‍टनचे मोठे विधान, "भारत-पाकिस्‍तान फायनल..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : T20 World Cup स्‍पर्धा आता अंतिम टप्‍प्‍यात आली आहे. जगभरातील कोट्यवधी चाहत्‍यांना २००७ प्रमाणे पुन्‍हा एकदा फायनलमध्‍ये भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यातील महामुकाबला पाहायची इच्‍छा आहे. मात्र याबाबत इंग्‍लंडचा कर्णधार जोस बटलर याने मोठे विधान केले आहे. ( Jos buttler )

पहिला सेमीफायनल सिडनीत न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात बुधवारी (९ नोव्हेंबर) होणार आहे. तर दुसरा सेमीफायनल भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अ‍ॅडलेड येथे गुरुवारी (१० नोव्हेंबर) होणार आहे. या दोन्‍ही सामन्‍यात जिंकणारा संघ रविवार, १३ नोव्‍हेंबर रोजी अंतिम सामना खेळतील.

Jos buttler : आम्‍ही तसे घडू देणार नाही…

सेमी फायनल आधी इंग्‍लंडचा कर्णधार जोस बटलर म्‍हणाला की, “मी स्‍वत: या स्‍पर्धेत भारत आणि पाकिस्‍तान या दोन संघातील फायनल बघणार नाही. कारण आम्‍ही तसे घडू देणार नाही. भारतीय संघ फायनलमध्‍ये जाणार नाही, यासाठीच आम्‍ही मैदानात उतरणार आहोत”.

सूर्यकुमारची फलंदाजी पाहणे आनंददायी अनुभव

भारतीय संघ खूपच मजबूत आहे. मागील काही दिवस हा संघ उत्तम कामगिरी करत आहे. भारताकडे खूपच प्रतिभावंत खेळाडू आहेत. सूर्यकुमार यादव याने या स्‍पर्धेत उत्‍कृष्‍ट कामगिरी केली आहे. त्‍याची फलंदाजी पाहणे हा एक आनंददायी अनुभव असतो. या स्‍पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्‍याच्‍याकडे प्रत्‍येक चेंडूवर फटका मारण्‍याची क्षमता आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहल हा चांगला गोलंदाज आहे. तो विकेट घेण्‍यासाठी नेहमी उत्‍सुक असतो. मला विश्‍वास आहे की, त्‍याला संधी मिळाल्‍यास तो उत्‍कृष्‍ट कामगिरी करेल, असेही बटलर याने म्‍हटलं आहे.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button