INDIA IN T20 WORLD CUP : टीम इंडियाची चौथ्यांदा सेमी फायनलमध्ये धडक, २००७ ची पुनरावृत्ती हाेणार? | पुढारी

INDIA IN T20 WORLD CUP : टीम इंडियाची चौथ्यांदा सेमी फायनलमध्ये धडक, २००७ ची पुनरावृत्ती हाेणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने अविस्मरणीय कामगिरी करत २००७ मधील टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेत अंतिम सामन्यात गवसणी घेतली हाेती. क्रिकेट टी-२० फ़ॉर्मेटमधील पहिलाचा विश्‍वचषक जिंकत भारताने इतिहास घडवला हाेता. यंदा अशीच ऐतिहासिक कामगिरी करण्‍यासाठी टीम इंडिया आता अवघी दोन पावले दूर आहे. आजवर कोणत्या टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धांमध्‍ये टीम इंडियाने सेमीफायनलमध्‍ये धडक मारली याविषयी जाणून घेवूया…

भारतीय संघाने २००७ दक्षिण आफ्रिकेत खेळवलेल्या गेलेल्या  विश्वचषक स्‍पर्धेत  अंतिम फेरीत धडक मारली होती. पाकिस्तानचा ५ धावांनी पराभव करत भारताने २००७ विश्वचषक आपल्या नावावर केला होता. यानंतर २००९, २०१० आणि २०१२ साली झालेल्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाला सेमी फायनल गाठण्यात अपयश आले होते. (INDIA IN T20 WORLD CUP )

२०१४ मध्ये गाठली होती अंतिम फेरी

२००७ नंतर ७ वर्षांनी म्हणजेच २०१४ सालच्या टी २० विश्वचषकात भारताने सेमी फायनल गाठली होती. हा विश्वचषक बांगलादेशमध्ये खेळवण्यात आला होता. सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ६ विकेट्सने धुव्वा उडवत टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली. यानंतर २०१४ टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाची गाठ श्रीलंकेशी पडली. मात्र, श्रीलंकेने भारताला ६ विकेट्सने नमवत विश्वचषक जिंकला होता. (INDIA IN T0 WORLD CUP)

२०१६ साली वेस्टइंडिजकडून पराभूत  (INDIA IN T20 WORLD CUP )

वेस्ट इंडिजच्या संघाने कार्लोस ब्रॅथवेटच्या दमदाक फटकेबाजीच्या जोरावर २०१६ च्या टी-२० विश्वचषकाच्या फायनल सामन्यात विजय संपादन केला होता. २०१६ च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने सेमी फायनल गाठली होती. हा विश्वचषक भारतातच खेळवण्यात आला होता. विश्वविजेत्या ठरलेल्या वेस्टइंडिजने सेमी फायनलमध्ये भारताचा ७ विकेट्सने प उडवला होता. २०१६ नंतर २०२१ साली झालेल्या टी-२० विश्वचषक भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. २०२१ च्या विश्वचषकात भारतीय संघ साखळी फेरीतूनच बाद झाला होता. (INDIA IN T20 WORLD CUP )

यंदा २००७ ची पुनरावृत्ती हाेणार?

सध्या २०२२ टी-२० विश्वचषक सुरू असून टीम इंडियाने झिम्बाब्वेचा ७१ धावांनी पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमी फायनलमध्ये भारताची लढत इंग्लंडविरूद्ध असणार आहे. या विश्वचषकात भारत २००७ आणि २०१४ प्रमाणे अंतिम फेरीत धडक मारणार? की २०१६ प्रमाणे सेमी फायनलमध्येच आपला प्रवास थांब‍णार हे येत्या गुरूवारीचं (दि.१३) समजणार आहे. (INDIA IN T20 WORLD CUP )

हेही वाचंलत का?

Back to top button