पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत आज ( दि.९ ) सिडनी मैदानावर पहिली सेमी फायनल होणार आहे. फायनलमध्ये धडक मारण्यासाठी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आमने-सामने आहेत. ( PAK vs NZ T20WC ) या स्पर्धेतील सात सामन्यांवेळी पाऊस झाला. त्यामुळे चार सामने रद्द करण्यात आले. सुपर-१२ मध्ये पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघाचा प्रत्येकी एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.
'वेदर डॉट कॉम'ने दिलेल्या माहितीनुसार, "सिडनीमध्ये आज सकाळी पावसाची शक्यता आहे. मात्र यानंतर बहुतांश हवामान कोरडे राहणार आहे. सामन्यावेळी पावसाची शक्यता नाही. सडनीमधील तापमान १८ ते २० डिग्री सेल्सियस राहील. सकाळी पाऊस झाला तरी दुपारनंतर हवामान कोरडे राहील."
आज सायंकाळी पावसाची शक्यता नाही. त्यामुळे या सामन्यात पावसामुळे अडथळा देणार नाही. पूर्ण सामना होईल, सिडनीमध्ये सायंकाळी सात वाजता सामना सुरु होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी दीड वाजता सुरु होणार आहे.
हेही वाचा :