Rohit Sharma T20WC : रोहित शर्मा दुखापतीतून सावरला; सेमी फायनलपूर्वी टीम इंडियाला दिलासा | पुढारी

Rohit Sharma T20WC : रोहित शर्मा दुखापतीतून सावरला; सेमी फायनलपूर्वी टीम इंडियाला दिलासा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टी-२० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत सेमी फायनल सामन्यासाठी सज्ज झालेल्या टीम इंडियाला आज मोठा दिलासा मिळाला आहे. ॲडलेडमध्ये सराव सत्रादरम्यान कर्णधार रोहित शर्मा याला दुखापत झाली होती. या दुखापतीमधून रोहित  सावरला असून तो सेमी फायलनसाठी सज्‍ज झाला आहे. ( Rohit Sharma T20WC )

आपण सेमी फायलनसाठी फिट असल्‍याचे ट्विट रोहित शर्मा याने केले आहे. सरावादरम्‍यान मला किरकोळ दुखापत झाली होती. आता मी पूर्णपणे फिट असल्‍याचे रोहितने म्‍हटलं आहे.

T20 World Cup च्या सेमीफायनल सामन्याला काही तास उरले असताना रोहित शर्माला दुखापत झाली होती. त्‍याच्‍या उजव्या हाताला नेटमध्ये सराव करताना मार लागला होता. नेटमध्ये सराव करताना रोहित भारतीय संघाचा साइडआर्म थ्रोअर एस रघूकडून थ्रोडाउन घेत होता. तेव्हा चेंडू त्याच्या उजव्या हातावर आदळला. यामुळे त्याला तीव्र वेदना झाल्या. त्यानंतर तो लगेच नेटमधून बाहेर पडला होता. त्‍यामुळे तो सेमी फायनलमध्‍ये खेळणार का याबाबत प्रश्‍नचिन्‍ह होते. आता रोहित शर्मा याने तो फीट असल्‍याचे स्पष्ट केल्याने टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे. ( Rohit Sharma T20WC )

टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतील सुपर-१२ मधील ग्रुप २ मध्ये शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेला पराभूत करून स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताबरोबरच न्यूझीलंड, इंग्लंड व पाकिस्तान यांनीही अंतिम चारमध्ये प्रवेश केला. पहिला  सेमीफायनल सिडनीत न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात बुधवारी (९ नोव्हेंबर) तर दुसरा सेमीफायनल भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अ‍ॅडलेड येथे गुरुवारी (१० नोव्हेंबर) होणार आहे.

 

 

Back to top button