Elon Musk Perfume Salesman : एलॉन मस्क झाला ‘अत्तराचे व्यापारी’, 10 मिनिटांत झाली 10000 कुपींची विक्री

Elon Musk Perfume Salesman : एलॉन मस्क झाला ‘अत्तराचे व्यापारी’, 10 मिनिटांत झाली 10000 कुपींची विक्री
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क आता परफ्यूम सेल्समन बनले आहेत. त्याच्या ट्विटर अकाऊंटवरही त्यांनी याबाबत अपडेट्स दिले आहेत. मस्क यांनी बर्न्ट हेअर (Burnt Hair ) नावाचा परफ्यूम ब्रँड लॉन्च केला आहे. हा जगातील सर्वोत्तम सुगंध असलेला परफ्यूम असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लॉन्च केल्याच्या 10 मिनिटांत बर्न्ट हेअर या परफ्यूमच्या 10,000 कुपी विकल्याचेही वृत्त आहे. (Elon Musk Perfume Salesman launches Burnt Hair product with Boring Company)

द बोरिंग कंपनीच्या वेबसाइटद्वारे 'बर्न्ट हेअर' परफ्यूमची विक्री

द बोरिंग कंपनीच्या वेबसाईटवरून 'बर्न्ट हेअर' परफ्यूमची विक्री केली जात आहे. या परफ्यूमची किंमत 100 यूएस डॉलर आहे, जी भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 8400 रुपये मानली जात आहे. एलॉन मस्क यांनी खुलासा केला की बर्न्ट हेअर परफ्यूम क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे देऊन देखील खरेदी केले जाऊ शकतो. यासाठी शिपिंग शुल्क 3,000 रुपये असेल. (Elon Musk Perfume Salesman launches Burnt Hair product with Boring Company)

टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्स (SpaceX) सारख्या कंपन्यांचे प्रमुख एलॉन मस्क यांनी सप्टेंबरमध्ये परफ्यूम मार्केटमध्ये एन्ट्री घेणार असल्याची घोषणा केली होती. त्या घोषणेनंतर अनेकांना मस्क विनोद करत असल्याचे वाटले. पण आता बोरिंग कंपनीच्या साईटवर बर्न्ट हेअर परफ्यूमचे खरेदीचे पेज पाहिल्यानंतर तो परफ्यूम मार्केटमध्ये खरेदीसाठी दाखल झाल्याची पुष्टी झाली आहे. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Elon Musk Perfume Salesman launches Burnt Hair product with Boring Company)

Burnt Hair चे वैशिष्ट्य

Burnt Hair परफ्यूमचे वैशिष्ट्य सांगताना एलॉन मस्क यांनी ट्विट केले आहे. 'पृथ्वीवरील सर्वोत्तम सुगंध!' असे म्हणत या परफ्यूमच्या कुपीचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. तसेच हा एक असा परफ्यूम आहे, जो तुम्हाला गर्दीतून वेगळे बनवतो. तुम्ही विमानतळावरून जात असतानाही लोकांचे लक्ष वेधून घेतो. कंपनीने त्‍याच्‍या 10,000 कुपींची विक्री लाँच झाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये केल्या आहेत, असाही दावा मस्क यांनी ट्विटरवरून केला आहे. (Elon Musk Perfume Salesman launches Burnt Hair product with Boring Company)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news