

चारठाणा; पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने गोदरी नदीला पूर आला आहे. नदी दुथडी भरून वाहत असून कसबा व पेठ विभागाचा तीन तास संपर्क तुटला. परतीच्या पावसाने सोयाबीनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चारठाणा येथील दोन्ही गावांच्या मध्यभागातून गोदरी नदी वाहते. मंगळवारी पावसाने दमदार हजेरी लावली. आज सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने गोदरी नदीला पूर आला आहे. पुलावरून पाणी वाहू लागल्याने कसबा व पेठ विभागातील सुमारे ३० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. परतीच्या पावसाने सोयाबीनसह अन्य पिकांचेही नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्णाण झाला आहे.
हेही वाचा :