IND vs SA 3rd ODI : आजच्‍या सामन्‍यावर 'दाटले ढग' , जाणून घ्‍या दिल्‍लीतील हवामान | पुढारी

IND vs SA 3rd ODI : आजच्‍या सामन्‍यावर 'दाटले ढग' , जाणून घ्‍या दिल्‍लीतील हवामान

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेतील तिसरा सामना आज ( दि. ११) दिल्‍लीतील अरुण जेटली मैदानावर होणार आहे. मात्र या सामन्‍यावर पावसाचे ढग दाटले आहेत. ( IND vs SA 3rd ODI ) तीन वनडे सामन्‍यांच्‍या या मालिकेत दोन्‍ही संघांनी एक-एक विजय मिळवत बरोबरी साधली. लखनौ येथे झालेल्या पहिला सामना पावसामुळे ४० -४० षटकांचा झाला होता. आता दिल्‍लीतही ढगाळ हवामान असून सामन्‍यावर पावसाचे सावट आहे.

दिल्‍लीत मागील काही दिवसांपासून पाउस सुरु आहे. आजही ४० टक्‍के पावसाचा अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे. तर हवामानाची माहिती देणार्‍या Accuweather वेबसाईटने ६१ टक्‍के हवामान ढगाळ राहिल, असा अंदाज व्‍यक्‍त केला आहे. ताशी २० किलोमीटर वेगाने वारे वाहण्‍याचा अंदाज आहे. कमाल तापमान २९ अंश तर किमान तापमान २१ अंश सेल्‍सियस राहण्‍याचा अंदाज आहे.

IND vs SA 3rd ODI : आजचा सामना दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्‍वपूर्ण

२२ फ्रेबुवारी २०१० नंतर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्‍ध भारतात १० वनडे सामने खेळले आहेत. यातील केवळ चारमध्‍ये विजय मिळवला आहे. तर सहा सामन्‍यात पराभववाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्‍याच मायभूमीत मालिका जिंकण्‍याचे आव्‍हान टीम इंडियासमोर असेल. तब्‍बल १२ वर्षांनंतर भारतीय संघाला ही संधी मिळाली आहे. आजचा सामना दक्षिण अफ्रिकेसाठी खूपच महत्त्‍वपूर्ण आहे. आजच्या सामन्‍यात पराभव झाला तर वनडे विश्‍वचषकामध्‍ये पात्रतेसाठी खेळण्‍याची नामुष्की या संघावर ओढावणार आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button