

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुलं हल्ली ऐकतच नाहीत. खूपच हट्ट करतात, अभ्यासावर लक्षच नाही, सतत मोबाईलवरच असतात, अशा अनेक तक्रारी कोरोना काळानंतर वाढलेला दिसत आहेत. मुलं ही त्यांच्या वयाप्रमाणे वागणार ही जरी गृहीत धरलं तरी सर्वसाधारणपणे मुलांच्या वागणुकीमध्ये झालेला बदल हा त्याची मानसिक स्थिती दर्शवत असतो. ( Kids Mental Health )आजच्या धावपळीच्या जगण्यात शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. मुलांना तुम्ही शरीराने मजबूत होण्यासाठी पोष्टीक आहार देतातच. तसेच तुम्ही त्याची खूप काळजीही घेता; पण न कळत त्याच्या मानसिकतेकडे दुर्लक्ष होते. जर तुमच्या मुलांच्या वागणुकीत बदल झाल्यास त्याची काही लक्षणे आहेत. हीच लक्षणे पुढे मुलांच्या वाढीला बाधक ठरण्याचा धोका असतो. जाणून घेवूया ब्रिटननमधील कन्सल्टंट क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ. मेलिंडा रीस यांनी मुलांच्या मानसिकतेमध्ये झालेल्या बदलाविषयी सांगितलेल्या लक्षणांविषयी…
मुलांच्या मनात नेमकं काय चालले आहे, हे जाणून घेण हे कठीण असते. त्यामुळे त्यांच्या वागण्यातही परिस्थितीनुसार बदल होतो. तुमचं मुल सलग काही वेळ एकटं राहत असेल किंवा कुटुंबाबरोबर कमी वेळ घालवत असेल तसेच पूर्वी सतत मित्रांमध्ये खेळणारे मुलं अचानक एकट राहू लागलं तर याकडे दुर्लक्ष करु नका. अशा अवस्थेत मुलांना समजून घ्या. त्यांना एकटं सोडू नका. त्यांच्याबरोबर फिरायला जा. त्यांच्याशी संवाद साधून एकटं राहण्याचं कारण विचारा.
किशोरावस्थेत मुलांनी उशिरापर्यंत झोपणे सामान्य मानलं जातं. मात्र तुमची मुले सतत थकलेली दिसत असतील. तसेच कोणतीही गोष्ट करण्यास आळस करत असतील तर निश्चित ही दखल घेण्यासारखीच बाब आहे. अभ्यासापासून खेळण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये थकलेले मूलाच्या मानसिक अवस्थेचा विचार करा. हे लक्षण त्याच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासारखेच आहे.
कोरोना काळापासून मुलांमध्येही मोबाईल वापराच्या प्रमाणात भयावह वाढ झाली आहे. त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. अति मोबाईल वापराचा मुलांच्या मानसिक स्थितीवरही परिणाम होत आहे. अलिकडे बहुतांश किशोरवयीन मुले ही TikTok, Snapchat, BeReal आणि Instagram सारख्या ॲप्सचा वापर करतात. त्यामुळे ही बहुतांश काळ हा सोशल मीडियावरच असतात. यामुळे त्याच्या आपल्या कुटुंबीयांची आणि नात्यांमधील वास्तव संबंध कमी येतो. याचा परिणाम नातेसंबंधावर होत आहे. मोबाईल फोनचा वापर केल्यानंतर तुमची मुलं मानसिकदृष्टया व्यथित आणि अस्वस्थ दिसत असतील तर याकडे गांभीर्याने लक्ष द्या, कारण सोशल मीडियाचा अतिवापर हा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतो. सोशल मीडियापासून काही काळ ब्रेक कसा घ्यावा, याविषयी ऑनलाईन अनेक मार्गदर्शन उपलब्ध आहे. याच्या मदतीने पालकांनी मुलांना सोशल मीडियापासून लांब ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच मुलांचा फोन तपासा, तो काय पाहतोय याकडे दुर्लक्ष करु नका. तसेच स्क्रीनटाइम मर्यादित करण्यासाठी तुम्ही बदलू शकता अशा माेबाईल फाेनमध्ये बहुतांश सेटिंग्ज आहेत, याचा वापर करा
घरातील जेवण हा पालक आणि मुलांमधील संवाद वाढवतो. या वेळी दोघेही एकमेकांशी अनेक गोष्टी शेअर करत असतात. मात्र तुमचे मुल तुमच्याबरोबर जेवण करायला टाळत असेल तर ते मानसिक तणावात तुमच्यापासून काही तरी लपविण्याचा प्रयत्न करत आहेत का हे तपासा. त्यामुळे मुलांशी संवाद साधत त्यांना कुटुंबापासून अलिप्त होवू देवू नका.
राग येणे ही स्वाभाविक बाब आहे. मात्र मुलांना प्रचंड राग येत असेल किंवा ते अचानक रडायला लागत असतील तर हे मानसिकदृष्ट्या काळजीचे कारण ठरते. तुमचे मुलं भावनावर प्रक्रिया करण्यासाठी धडपडत असतात. त्यामुळे त्यांचा राग अनावर होतो. त्यामुळे तुमची मुलं जर प्रचंड रागवत असतील किंवा अचानक रडत असतील तर याकडे दुर्लक्ष करु नका.त्यांना पुरेसावेळ द्या. त्यांच्या रागाचे आणि रडण्याचे कारण समजून घ्या.
मुलांना अनेक गोष्टींचे कुतूहल असते. ते पालकांना अनेक प्रश्नही विचारतात. तसेच या कुतूहलातूनच ते चित्रकला, संगीत, गायन, खेळ आदींपैकी एक छंद जोपासतात. आवडती गोष्टीला ते खूप वेळ देतात. नंतर हाच त्यांचा छंद होतो. मात्र तुमचे मुलं छंदासाठीही वेळ देत नसेल तर त्याच्या मानसिक अवस्थेत बदल झाल्याचे ते लक्षण ठरते. मुलांनी जर अचानक आपला छंद सोडला तर याकडे दुर्लक्ष करु नका. त्यांची अत्यंत योग्य पद्धतीने विचारपूस करा, त्यांना विश्वासात घ्या. छंद सोडण्याचे कारण विचारा. यातून त्याची बदलेल्या मानसिकतेबद्दल तुम्हाला माहिती होईल.
वास्तविक मुलांचे मूल्यमापन त्याच्या शालेय गुणांवर कधीच करु नये. मात्र शाळेत एकाग्रतेने अभ्यास करणारे आणि चांगले गुण मिळवणारे विद्यार्थांचा दर्जा एकदमच घसरला तर याचा विचार करा. कारण त्याच्या मानसिकतेत झालेला बदल हा त्याच्या गुणांवर व एकाग्रतेवर झालेल्याचे दिसते. यासाठी पालकांनी मुलांच्या शिक्षकांच्या संपर्कात राहावे. त्यांना शाळेत येणार्या अडचणीही समजून घ्यावेत, असेही कन्सल्टंट क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ. मेलिंडा रीस सूचवतात.
हेही वाचा :