Aus Vs WI 2nd T20 : विंडीजला पराभूत करत ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय | पुढारी

Aus Vs WI 2nd T20 : विंडीजला पराभूत करत ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय

ब्रिस्बेन; पुढारी ऑनलाईन : सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे झुजांर अर्धशतक आणि आघाडीचा गोलंदाज मिशेल स्टार्क यांच्या भेदक गोलंदाजीच्या जिवावर पाहुण्या वेस्ट इंडिजला दुसऱ्या टी २० सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३१ धावांनी पराभूत केले. या पराभवासह ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला व्हाईट व्हॉश देत मालिका २-० ने खिशात घातली. ब्रिसबेन यथे शुक्रवारी हा सामना खेळविण्यात आला होता. (Aus Vs WI 2nd T20)

डेव्हिड वॉर्नरने आक्रमक फटकेबाजीद्वारे ४१ चेंडूत ७५ धावांची केलेली खेळी आणि मध्यक्रमातील टीम डेव्हिडच्या बहुमोल ४२ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ७ बाद १७८ धावा बनवल्या. वॉर्नर आणि टीम डेव्हिड वगळता ऑस्ट्रेलिया इतर फलंदाजांना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. कर्णधार ॲरॉन फिंच १५ धावा, स्टीव्ह स्मिथ १७ धावा तर मॅथ्यू वेड १६ धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून गोलंदाज अल्जारी जोसेफ याने तीन बळी घेतले. तर मेकॉय याने २ आणि ओडियन स्मिथला एक बळी मिळविण्यात यश आले. (Aus Vs WI 2nd T20)

ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या १७९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या फलंदाजांना आव्हनाचा पाठलाग करताना चांगलीच दमछाक झाली. वेस्टेइंडिजचे फलंदाजांनी ठराविक अंतराच्या काळात विकेट्स ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना बहाल करत राहिले. कोणत्याही फलंदाजांना वैयक्तीक मोठी धावा संख्या उभारता आली नाही तसेच मोठी भागिदारी न रचता आल्याने अवघा वेस्ट इंडिजचा संघ ८ बाद १४७ पर्यंतच पोहचू शकला. मिशेल स्टार्कच्या भेटक माऱ्या पुढे वेस्ट इंडिज फलंदाजांनी माना टाकल्या. स्टार्कने ४ षटकात २० धावा देत ४ बळी घेतले. यात त्याने काईल मेअर्स, निकोलस पुरन, जेसन होल्डर आणि ओडियन स्मिथ यांना तंबुत धाडले. त्याला पॅट कमिन्स दोन बळी घेत चांगली साथ दिली. तर कॅमरुन ग्रीन आणि ॲडम झॅम्पा यांना प्रत्येकी एक बळी मिळविण्यात यश आले. (Aus Vs WI 2nd T20)

आघाडी फलंदाज डेव्हिड वॉर्नर फॉर्ममध्ये आल्याने ऑस्ट्रेलियाला चांगला दिलासा मिळाला आहे. २२ ऑक्टोंबर पासून ऑस्ट्रेलियातच खेळवल्या जाणाऱ्या टी २० विश्व चषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ सज्ज झाला आहे. तर या पुर्वी ऑस्ट्रेलिया इंग्लड सोबत तीन टी २० सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका दोन्ही संघासाठी विश्वचषकाची रंगीत तालीमच ठरणार आहे.


अधिक वाचा :

Back to top button