Shubman Gill : शुबमन गिलने केला अनोखा ‘विक्रम’, नवज्योत सिंग सिद्धू यांना टाकले मागे | पुढारी

Shubman Gill : शुबमन गिलने केला अनोखा 'विक्रम', नवज्योत सिंग सिद्धू यांना टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला गुरुवारी (६ ऑक्टोबर) सुरुवात झाली. भारताचा सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) सामन्यात फलंदाजी करण्यात यशस्वी झाला नाही. गिल तीन धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला कागिसो रबाडाने क्लीन बोल्ड केले. गिलने तीन धावांच्या छोट्या डावात एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा विक्रम करत त्याने माजी सलामीवीर नवज्योतसिंग सिद्धू यांना मागे टाकले आहे.

शुबमन गिल  (Shubman Gill) सर्वात कमी डावात ५०० धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आपल्या १०व्या डावात ही कामगिरी केली. सर्वात जलद ५०० धावा करण्याचा विक्रम नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नावावर होता. यासाठी त्यांनी ११ डाव खेळले होते. गिलने या सामन्यापूर्वी वनडेत ९ डावात ४९९ धावा केल्या होत्या. त्याला हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी एका धावाची गरज होती. सामन्यामध्ये धाव घेत त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला.

हा विक्रम शुबमनने आपल्या नावावर केल्यामुळे सिद्धू दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत. तसेच, पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज फखर जमान तिसऱ्या स्थानावर आहे. जमानने १२ डावात ५०० धावा पूर्ण केल्या होत्या. त्याचवेळी शिखर धवन, केदार जाधव आणि श्रेयस अय्यर या भारतीय फलंदाजांनी ५०० धावांचा आकडा पार करण्यासाठी १३ डाव खेळले आहेत. वनडेमध्ये सर्वात जलद १००० धावा करण्याचा विक्रम फखरच्या नावावर आहे. यासाठी त्याने १८ डाव खेळले.

हेही वाचा :

Back to top button