IND vs SA 1st ODI : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वन डेवर पावसाचे सावट, सामना उशीरा सुरु होणार
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला आजपासून ( दि. ६) सुरुवात होत आहे. आजचा सामना लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. ( IND vs SA 1st ODI ) नियोजनानुसार हा सामना दीड वाजता सुरु होणार होता. मात्र लखनौमध्ये पावसाची शक्यता असल्याने सामना अर्धा ते एक तास उशीरा सुरु होईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय ) म्हटलं आहे.
सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी सराव केला आहे. Accuweather नुसार लखनौमध्ये गुरुवारी ढगाळ वातावरण असणार आहे. संपूर्ण दिवसभरात पावसाची शक्यता ९६ टक्के आहे. दिवसभर पावसाची उघडझाप सुरुच राहिल. लखनोमधील कमाल तापमान ३० तर किमान २५ डिग्री सेल्सियस राहणार आहे. दिवसभर ९४ टक्के ढगाळ वातावरण असेल. लखनौत आज दुपारी एक ते तीन या वेळेतच मुसळधार पावसाचा अंदाज Accuweatherने व्यक्त केला आहे. आता नाणेफेक दीड वाजता तर सामना दुपारी २ वाजता सुरु हाेईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
IND vs SA 1st ODI : शिखर धवन करणार टीम इंडियाचे नेतृत्त्व
ऑस्ट्रेलियात होणार्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडिया रवाना झाल्याने या मालिकेत भारताचे स्टार क्रिकेटपटू असणार नाहीत क्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी शिखर धवन याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. या मालिकेत संजू सॅमसनसह शुभमन गिलच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असणार आहे. शिखर धवन याच्या नेतृत्वाखालील संघाने यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकली आहे.
हेही वाचा :

